(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Australia Tour | रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश, तर विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार
रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : येत्या 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयला मेडिकल टीमकडून खेळाडूंचे दुखापत अहवाल आणि अपडेट्स मिळाल्यानंतर निवड समितीने हे बदल केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियातील पहिल्या अॅटलेड कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयकडून विराटला पॅटर्निटी लीव्ह मंजूर झाली आहे.
बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी याबाबत निवड समितीला कळविले आहे. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनला निवड समितीने भारताच्या एकदिवसीय संघात अतिरिक्त विकेटकीपर म्हणून सामील केलं आहे.
ईशांत शर्मा पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्यांना कसोटी संघात समिवष्ट करुन घेतलं जाणार आहे. तर खांद्याच्या दुखापतीमुळे फिरकीपटू वरुन चक्रवर्ती टी -20 मालिकेमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने त्याच्या जागी टी नटराजनचा समावेश केला आहे. युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर येणार नाही कारण तो अजूनही गोलंदाजीवर वैद्यकीय टीम सोबत काम करत आहे.
Updates - India’s Tour of Australia
The All-India Senior Selection Committee met on Sunday to pick certain replacements after receiving injury reports and updates from the BCCI Medical Team. More details here - https://t.co/8BSt2vCaXt #AUSvIND pic.twitter.com/Ge0x7bCRBU — BCCI (@BCCI) November 9, 2020
टी -20 संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन.
एकदिवसीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर).
कसोटी संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धीम साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; दुखापतग्रस्त रोहित शर्मा, ईशांत शर्माचा समावेश नाही