एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; दुखापतग्रस्त रोहित शर्मा, ईशांत शर्माचा समावेश नाही

दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि ईशांत शर्माचा भारतीय संघात समावेश नाही. लोकेश राहुल वन डे, टी20 चा उपकर्णधार असणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

INDvsAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आयपीएल 2020 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 टीममधून बाहेर आहे. लोकेश राहुल वन डे, टी20 चा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी -20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टी -20 संघात स्थान मिळालं आहे.

रोहित शर्माला आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे आणि म्हणूनच गेल्या दोन सामन्यात तो खेळू शकलेला नाही. त्यामुळे टी -20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इशांत शर्माच्या नावाचाचा संघात समावेश नाही. बीसीसीआयने म्हटलं की, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित आणि ईशांतवर नजर ठेऊन आहेत. संजू सॅमसनलाही या संघात स्थान मिळालं आहे.ऋषभ पंतचं नाव संघात नाही.

शुभमन गिलला वनडे संघात संधी मिळाली आहे. मयंक अग्रवाललाही एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. शार्दुल ठाकूरलाही एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय आणि टी -20 सामन्यात रोहितच्या जागी मयंक अग्रवालची निवड झाली आहे. त्यामुळे मयंक शिखर धवन याच्यासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकेल. सलामीवीर म्हणून शुभमन गिल हा तिसरा पर्याय असू शकेल.

कसोटीमध्ये शुभमन गिलला कायम ठेवण्यात आले आहे.ऋषभ पंतला रिद्धिमान साहासह सामील करण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. कसोटीत मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ असे दोन सलामीवीर पर्याय आहेत. तर केएल राहुल तिसरा पर्यायही आहे. मात्र राहुलचा अनुभव पाहता त्याला पसंती दिली जाऊ शकते.

कसोटी संघ विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी -20 संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget