एक्स्प्लोर
द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
यामध्ये रैनासह जयदेव उनाडकट, दिनेश कार्तिक यांनाही संधी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जवळपास एका वर्षानंतर भारताच्या टी-20 संघामध्ये सुरेश रैनाचं पुनरागमन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रैनासह जयदेव उनाडकट, दिनेश कार्तिक यांनाही संधी देण्यात आली आहे.
सुरेश रैना अखेरचा टी-20 सामना गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. यामध्ये एका वेगवान शतकाचाही समावेश होता. त्याचीच पावती म्हणून त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती घेतलेल्या शिखर धवनचाही संघात समावेश आहे. तर याच मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकटलाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर सहा सामन्यांच्या वन डे मालिकेला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. 16 फेब्रुवारीला या मालिकेतला अखेरचा आणि सहावा वन डे सामना झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 21 आणि 24 फेब्रुवारीला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येईल.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement