एक्स्प्लोर

वन डेतलं तिसरं द्विशतक रोहितसाठी लाखमोलाचं

सचिन तेंडुलकर नावाच्या मास्टर ब्लास्टरनं पहिल्यांदा हा मैलाचा दगड ओलांडला, त्या वेळी वन डे क्रिकेटचा इतिहास तब्बल ३९ वर्षे जुना झाला होता.

मोहाली: दिनांक २ नोव्हेंबर २०१३- रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं पहिलं द्विशतक साजरं...मैदान होतं बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी होता ऑस्ट्रेलिया दिनांक १३ नोव्हेंबर २०१४ - रोहित शर्मानं झळकावलं वन डे कारकीर्दीतलं दुसरं द्विशतक... मैदान होतं कोलकात्याचं ईडन गार्डन्स आणि प्रतिस्पर्धी होता श्रीलंका. आणि दिनांक १३ डिसेंबर २०१७ - मैदान होतं मोहालीचं पीसीए स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी होता पुन्हा श्रीलंका रोहित शर्मानं ठोकलं वन डे कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक... वन डे क्रिकेटच्या मैदानात खरं तर एका रथीमहारथीला एक द्विशतक ठोकणंही मुश्किल असतं. सचिन तेंडुलकर नावाच्या मास्टर ब्लास्टरनं पहिल्यांदा हा मैलाचा दगड ओलांडला, त्या वेळी वन डे क्रिकेटचा इतिहास तब्बल ३९ वर्षे जुना झाला होता. त्यानंतर वीरेंद्र सहवाग, मार्टिन गप्टिल आणि ख्रिस गेलनं वन डेत प्रत्येकी एकदा द्विशतकाचा टप्पा ओलांडला. पण रोहित शर्मानं गेल्या चार वर्षांत वन डेत तिसऱ्यांदा द्विशतक झळकावण्याची कमाल केली. रोहित शर्माला त्याच्या दुसऱ्या द्विशतकानं २६४ धावांचा वन डेतला वैयक्तिक उच्चांक गाठून दिला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्यासाठी तिसरं द्विशतक लाखमोलाचं ठरावं. कारण रोहितनं हे द्विशतक नेमकं त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी साजरं केलं. आणि विशेष रोहितची पत्नी रितिका सजदे त्या वेळी मोहालीच्या स्टेडियममध्ये उपस्थित होती. रोहित शर्मा आणि त्याच्या टीम इंडियाला धरमशालाच्या मैदानात धावांचा उपवास घडला होता. तिथल्या पहिल्या वन डेत भारतीय कर्णधाराला लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. त्या पराभवानं पेटून उठलेला रोहित मोहालीच्या रणांगणात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. त्याच्या १५३ चेंडूंमधल्या नाबाद २०८ धावांच्या खेळीला १३ चौकार आणि १२ षटकारांचा साज होता. रोहितच्या लाडक्या रितिकासाठी तो साज आणि ते द्विशतक आजवरचं सर्वात अनमोल गिफ्ट ठरावं. वन डेतला पहिला द्विशतकवीर सचिन तेंडुलकरनं रोहितला शाबासकी देताना ट्विटरवर म्हटलंय की, मित्रा तुला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. तुझी फलंदाजी पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. रोहितनं हा आनंद पुन्हा पुन: लुटू द्यावा हीच सचिनसह त्याच्या चाहत्यांची इच्छा असावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Embed widget