एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वादग्रस्त कसोटीत दक्षिण आफ्रिकेची बाजी
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीसमोर अक्षरश: लोटांगण घातलं.
केपटाऊन (द. आफ्रिका) : बॉल टेम्परिंगमुळे गाजलेल्या केपटाऊनच्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेन ऑस्ट्रेलियावर 322 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 430 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 107 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीसमोर अक्षरश: लोटांगण घातलं.
दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलनं 23 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर केशव महाराजनं दोन विकेट्स घेतल्या.
- दक्षिण आफ्रिका – 311, 373
- ऑस्ट्रेलिया – 255, 107
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
क्राईम
Advertisement