एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्णधार धोनीच्या भविष्यावर गांगुलीचा सवाल
नवी दिल्ली : निवड समिती 2019 च्या विश्वचषकापर्यंत महेंद्रसिंह धोनीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून खेळवणार असेल तर ही धक्कादायक बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिली आहे. तसंच विराट कोहलीकडे लवकरच संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे संकेतही गांगुलीने दिले आहेत.
धोनीमध्ये अजून चार वर्ष खेळण्याची क्षमता आहे का?
निवड समितीला भारतीय संघाच्या भविष्याबाबत निर्णय घेणं गरजेचं असल्याचं गांगुली म्हणाला. धोनी मागील्या 9 वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार आहे. धोनीने ज्या पद्धतीने कर्णधाराची भूमिका निभावली आहे, ती कमालीची आहे. मात्र, संघाला 2019 च्या विश्वचषकापर्यंत घेऊन जाण्याची किंवा अजून चार वर्ष खेळण्याची क्षमता धोनीमध्ये आहे का असा प्रश्न पडतो. कारण त्याने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त वन-डे आणि टी-20 क्रिकेट खेळत आहे, असंही गांगुलीने नमूद केलं.
2019 च्या विश्वचषकात धोनीच भारतीय संघाचा कर्णधार असेल का, या प्रश्नाचं निवड समितीने शोधलं पाहिजे. निवड समितीकडे उत्तर नसेल तर त्यांनी नवीन कर्णधार शोधावा. मात्र उत्तर नसेल आणि धोनीकडेच कर्णधारपदाची धुरा दिली तर ही बाब धक्कादायक आहे, असं मत गांगुलीने व्यक्त केलं.
क्रिकेट खेळणारे जगातील सर्व देश आपल्या संघाच्या भविष्याचं नियोजन करतात, त्यामुळे निवड समिती आणखी तीन ते चार वर्षांनंतरही धोनीला कर्णधाराच्या भूमिकेत पाहू इच्छितात का, असा सवाल गांगुलीने विचारला आहे.
विराटकडे कर्णधारपद सांभाळण्याची क्षमता
धोनीला क्रिकेट सोडण्याची गरज नाही, कारण वन-डे आणि टी-20 मध्ये संघाला अजूनही धोनीची गरज आहे, अशा शब्दात गांगुलीने धोनीचं कौतुकही केलं. मात्र, संघात कोहली सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळत आहे. त्याची खेळण्याची क्षमता प्रभावी आहे. कोहलीने कसोटी कर्णधारपदाची जबाबदारीही योग्यप्रकारे सांभाळली आहे.
मात्र, कोहलीला कर्णधार करण्याचा निर्णय धोनीच्या निर्णयावर अवलंबून आहे, असं गांगुलीने सांगितलं. त्यामुळे सध्या कोहलीमध्येच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे, असं गांगुलीने अधोरेखित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement