एक्स्प्लोर
स्मृती मानधनाचं वादळी अर्धशतक, महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 40 चेंडूत 76 धावांची स्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे तिने केवळ 25 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं.

फोटो : आयसीसी
मुंबई : सांगलीच्या स्मृती मानधनाने मुंबईत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठा विक्रम रचला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 40 चेंडूत 76 धावांची स्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे तिने केवळ 25 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं.
यासोबतच स्मृतीने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला. शिवाय सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारी ती आशियातील पहिलीच महिला खेळाडू ठरली. तीन दिवसांपूर्वीच तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 चेंडूत अर्धशत झळकावलं होतं.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने पूर्ण केलेलं स्मृतीचं हे चौथं अर्धशतक आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनने 18 चेंडूत शतक केलं होतं.
महिला क्रिकेटमधील वेगवान अर्धशतकं
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड, विरुद्ध भारत), 18 चेंडू, 2005 साली
डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज, विरुद्ध ऑस्ट्रेलिया), 22 चेंडू, 2009 साली
रेचल प्रीस्ट (न्यूझीलंड, विरुद्ध भारत), 22 चेंडू, 2015 साली
स्मृती मानधना (भारत, विरुद्ध इंग्लंड), 25 चेंडू
संबंधित बातम्या :
'सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन'
उजव्या हाताने लिहिणे, डाव्या हाताने तडाखे... स्मृती मानधनाचा प्रवास!
स्मृती मंधानाचं खणखणीत शतक, भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजवर विजय
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























