एक्स्प्लोर
श्रीलंकन टीम भारतात दाखल, 16 तारखेपासून कसोटी
श्रीलंका संघाचा मुक्काम कोलकात्यात असून, भारत दौऱ्यातल्या त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्याला १६ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरुवात होईल.
![श्रीलंकन टीम भारतात दाखल, 16 तारखेपासून कसोटी Shrilanka Cricket Team arrived in India latest updates श्रीलंकन टीम भारतात दाखल, 16 तारखेपासून कसोटी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/08234521/Srilanka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दिनेश चंडिमलच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर दाखल झाला आहे. श्रीलंका संघ भारत दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांसह तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतही खेळणार आहे.
श्रीलंका संघाचा मुक्काम कोलकात्यात असून, भारत दौऱ्यातल्या त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्याला १६ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरुवात होईल.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात यजमानांवर तिन्ही फॉरमॅट्समध्ये क्लीन स्विप साजरा केला होता. त्यामुळे मायदेशातल्या आगामी मालिकेतही टीम इंडिया निर्विवाद वर्चस्व गाजवेल, अशी अपेक्षा आहे.
भारत वि. श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक
कसोटी मालिका
- पहिली कसोटी – 16 ते 20 नोव्हेंबर (ईडन गार्डन, कोलकाता)
- दुसरी कसोटी – 24 ते 28 नोव्हेंबर (व्हीसीए, नागपूर)
- तिसरी कसोटी – 2 ते 6 डिसेंबर (फिरोज शाह कोटला, दिल्ली)
- पहिला वन डे – 10 डिसेंबर (धर्मशाला)
- दुसरी वन डे – 13 डिसेंबर (मोहाली)
- तिसरी वन डे – 17 डिसेंबर (विशाखापट्टणम)
- पहिली टी-20 – 20 डिसेंबर (कटक)
- दुसरी टी-20 – 22 डिसेंबर (इंदूर)
- तिसरी टी-20 – 24 डिसेंबर (मुंबई)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)