Afghanistan News: अफगाणिस्तानमधील महिला फुटबॉलचे भविष्य काय असेल? भारतातील ही व्यक्ती चिंतेत
Afghanistan News: फुटबॉल दिल्लीचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन यांनाही अफगाणिस्तानकडून वारंवार फोन येत आहेत. तिथं महिला फुटबॉलचे आयोजन करणारे लोक खूप घाबरले आहेत.
Afghanistan News: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जामुळे तेथील सर्व प्रकारच्या खेळांशी संबंधित खेळाडूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेच कारण आहे की अफगाणिस्तानात महिलांसाठी फुटबॉल सुरू करण्यात आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फुटबॉल दिल्लीचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन आता चिंतेत आहेत. त्यांना काळजी वाटते की आता तेथील महिला खेळाडू आणि प्रशासकांचे काय होईल.
महिला फुटबॉलशी संबंधित लोक भयभीत
फुटबॉल दिल्लीचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन यांनाही अफगाणिस्तानकडून वारंवार फोन येत आहेत आणि तेथे महिला फुटबॉलचे आयोजन करणारे लोक खूप घाबरले आहेत.
फिफाचे प्रादेशिक विकास अधिकारी (Regional development officer) यांच्या मते, शाजी प्रभाकरन यांनी अनेकवेळा अफगाणिस्तानला भेट दिली आहे. 2012 मध्ये अफगाणिस्तानमध्ये महिला फुटबॉल पहिल्यांदा सुरू झाली तेव्हाही शाजीने महत्त्वाची भूमिका बजावली.
गेल्या 9 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये महिला फुटबॉललाही बरीच लोकप्रियता मिळाली. पण आता भीती अशी आहे की महिला फुटबॉलशी निगडित लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. कारण तालिबान महिलांच्या खेळांना पाठिंबा देत नाही.
काबूलसह विविध राज्यांमध्ये महिलांसाठी फुटबॉलचे आयोजन करणाऱ्या प्रशासकांनीही शाजी प्रभाकरनला आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. यानंतर तेथील भारतीय दूतावास बंद करण्यात आले आणि त्यांना भारतासाठी व्हिसा अर्ज करण्याची वेळ आणि संधी मिळाली नाही. शाजी या सर्व लोकांच्या भवितव्याबद्दल चिंतित आहेत.
तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष
अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता अफगाणिस्तानच्या सत्तेवर पाणी सोडलं असून त्याचे हस्तांतरण करण्याची तयारी ठेवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होत असून तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार हा राष्ट्राध्यक्ष असेल अशी माहिती आहे.
काबुलमधील राष्ट्रपती भवनच्या परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमिरात बनवल्याची घोषणा करण्यात येणार असून तालिबानच्या या अंतरिम सरकारला चीनने समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानही तशा प्रकारचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आहे. अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे.