Champions Trophy 2025: पाकिस्तानींना दु:ख आवरेना! भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'मला आश्चर्य वाटलं असतं जर..'
Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरलंय. मात्र, या विजयाने पाकिस्तानचे अनेक लोक अजिबात खूश नाहीये.

India Wins Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) ची फायनल जिंकल्यामुळे रविवारी भारतात दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली संघाने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसी विजेतेपद पटकावले आहे, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते रोहित शर्माच्या शानदार सुरुवातीमुळे सोपे झाले. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत 12 वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघाचे (IND Vs NZ) नाव कोरलंय. मात्र, शेजारी देश पाकिस्तानचे (Pakistan Cricket Team) काही लोक अजूनही तेच जुने सूर गात आहेत. फायनलनंतर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला की टीम इंडिया जिंकली नसती तरच मला आश्चर्य वाटेलं असतं.
इंडिया जिंकली नसती तरच नवल- शाहिद आफ्रिदी
दरम्यान, समा टीव्हीशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारत संघ ज्या पद्धतीने त्याच मैदानावर खेळत होता, त्यामुळे त्याला स्पर्धेदरम्यान कठीण प्रवास करावा लागला नाही. त्याच मैदानावर सतत खेळून त्यांनी खेळपट्टी चांगली समजून घेतली. त्यामुळे अर्थातच त्यांना विजय हा मिळणारच होता. टीम इंडिया जिंकली नसती तरच मला नवल वाटलं असतं. अशातच बोलताना अँकरने पुन्हा तेच रडगाणे सुरू केले आणि याच मैदानावर खेळल्यामुळे टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले का, असा सवाल केला.
खेळपट्टीनुसार टीम इंडियाचे प्लेइंग 11चे उत्तम कॉम्बिनेशन- आफ्रिदी
पुढे बोलताना शाहिद आफ्रिदीने पुन्हा त्याच मैदानावर खेळण्याचे फायदे सांगितले. मात्र, ते आधीच ठरले होते, त्यामुळे आता काय बोलावे, असे त्यांनी नंतर सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन करताना आफ्रिदी म्हणाला, दुबईत फिरकीपटूंना मदत मिळेल, हे टीम इंडियाला माहीत होतं, त्यामुळे त्यांनी त्यानुसार चांगला संघ तयार केला. पुढे बोलताना, शाहिद आफ्रिदीनेही पाकिस्तानची खिल्ली उडवली. तो म्हणाला, "पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4 फिरकीपटू खेळवायचे होते, त्यांना तिथे खेळवले नाही, आता ते न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 4 फिरकीपटू वापरत आहेत, जिथे त्यांची गरज नाही." हे सांगताना आफ्रिदीलाही हसू आवरता आले नाही.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, आयसीसी अध्यक्षांनी दिली ट्रॉफी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि विजेत्याचा किताब पटकावला. टीम इंडियाने जिंकलेला हा तिसरा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता आहे. यापूर्वी त्याने 2002 आणि 2013 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते. चॅम्पियन झाल्यानंतर भारताला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी ट्रॉफी दिली.
हे ही वाचा























