एक्स्प्लोर

स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!

ऑस्ट्रेलिया संघाचं हे बॉल टेम्परिंग प्रकरण चुकीने झालेलं नाही. हा संघाच्या रणनितीचाच एक भाग होता हे खुद्द कर्णधारानेच मान्य केलं. सँडपेपरने बॉल घासण्याची जबाबदारी कॅमेरुन बेनक्रॉफ्टकडे देण्यात आली होती.

केपटाऊन : चेंडूशी छेडछाड करणं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगलंच महागात पडलं. कर्णधारपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर त्याच्यासोबतच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही पदावरुन पायउतार झाला. यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता. बॉल टेम्परिंगचा प्लॅन कसा ठरला? ऑस्ट्रेलिया संघाचं हे बॉल टेम्परिंग प्रकरण चुकीने झालेलं नाही. हा संघाच्या रणनितीचाच एक भाग होता हे खुद्द कर्णधारानेच मान्य केलं. सँडपेपरने बॉल घासण्याची जबाबदारी कॅमेरुन बेनक्रॉफ्टकडे देण्यात आली होती. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला बॅनक्रॉफ्टने केलेलं संपूर्ण कृत्य टेलिव्हिजन कॅमेरात टिपलं गेलं. पुन्हा पुन्हा त्याच्यावरच कॅमेरा नेण्यात आला. त्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली. हे दृष्य नंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमान यांनी पाहिलं. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोबतचा खेळाडू पीटर हँड्सकॉम्बला अलर्ट केलं. प्रशिक्षकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब तातडीने मैदानाकडे धावताना दिसला आणि त्याने बॅनक्रॉफ्टला याबाबत माहिती दिली. बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. ही घटना पुन्हा पुन्हा मैदानावरच्या स्क्रीनमध्ये प्ले करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 43 व्या षटकानंतर पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि निगेल लियाँग यांनी स्टीव्ह स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टशी घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. त्यानंतर चेंडू न बदलताच खेळ पुढे चालू ठेवण्यात आला. अखेरच्या सत्रात स्टीव्ह स्मिथ जवळपास अर्धा तास ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. कदाचित, यापुढे काय करायचं याची तयारी तो करत असावा. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकरच संपवण्यात आला. ऑस्ट्रेलिया संघाने यानंतर सर्व रेडिओ आणि टीव्हीच्या मुलाखती रद्द केल्या. त्याऐवजी स्टीव्ह स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चूक मान्य केली. शिवाय फायदा होण्यासाठी बॉल टेम्परिंग केल्याची कबुलीही दिली. संबंधित बातम्या : मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार? स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिलं स्थान गमावलं 
कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिलं स्थान गमावलं 
India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Embed widget