एक्स्प्लोर
आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, डी कॉकची तुफानी खेळी

सेन्चुरियन(दक्षिण आफ्रिका): क्विन्टन डी कॉकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स आणि 82 चेंडू राखून धुव्वा उडवला. सेन्चुरियनवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत नऊ बाद 294 धावांची मजल मारली होती आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 295 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना क्विन्टन डी कॉक आणि रिली रोसूने सलामीला 145 धावांची भागीदारी रचली. डि कॉकने 113 चेंडूंत 16 चौकार आणि 11 षटकारांसह 178 धावा फटकावल्या. तर रोसूने 45 चेंडूंत दहा चौकार आणि एका षटकारासह 63 धावांची खेळी केली. रोसू बाद झाल्यावर डी कॉकने फॅफ ड्यू प्लेसीसह दुसऱ्या विकेटसाठीही 123 धावांची भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























