एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या क्रीडा समितीमधून सचिन तेंडुलकर बाहेर

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथन आनंदला मोदी सरकारच्या क्रीडा समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2015 रोजी या समितीची स्थापना केली होती.

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथन आनंद यांना केंद्रातील मोदी सरकारने खेळाशी संबंधित समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मोदी सरकारने दोन्ही दिग्गजांना डिसेंबर 2015 मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून काढलं आहे. देशात खेळाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी  केंद्र सरकारने या समिती स्थापन केली होती.

नवे सदस्य म्हणून क्रिकेटर हरभजन सिंह आणि के. श्रीकांत यांचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी डिसेंबर 2015 मध्ये याची स्थापना केली होती. डिसेंबर 2015 पासून मे 2019 पर्यंत समितीच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदार आणि विश्वनाथन आनंदचा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.

बैठकांना दांडी मारल्याने सचिन, आनंदला बाहेरचा रस्ता आता समितीमध्ये सदस्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. समितीमध्ये आता 27 ऐवजी 18 सदस्य असतील. सचिन आणि आनंदशिवाय बॅडमिंटनचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद तसंच माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांनाही हटवण्यात आलं आहे. समितीच्या बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांना हटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोपीचंदही समितीमधून बाहेर पुलेला गोपीचंद यांना समितीमधून हटवण्यामागे त्यांची व्यस्त वेळापत्रक हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. गोपीचंद टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांचा समितीमध्ये समावेश केलेला नाही, असं सांगितलं जात आहे.

समितीमध्ये नव्या सदस्यांचा समावेश क्रीडा प्रकरणांच्या या समितीमध्ये नवे सदस्य म्हणून तिरंदाज लिम्बा राम, धावपटू पी.टी उषा, बछेंद्री पाल, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, नेमबाज अंजली भागवत, रेनेडी सिंह आणि पैलवान योगेश्वर दत्त यांचा समावेश करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget