एक्स्प्लोर
सचिन, गांगुली, लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, रवी शास्त्रींवर नाराजी?
क्रिकेट सल्लागार समिती अर्थात सीएससीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने क्रिकेट प्रशासकीय समिती प्रमुख (सीओए) विनोद राय यांना ई-मेल केला आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट आणि प्रशिक्षक निवडीवरुन सुरु झालेलं वादळ काही केल्या शमायला तयार नसल्याचं चित्र आहे. विराट कोहली - अनिल कुंबळे वाद, त्यानंतर रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी नियुक्ती, मग रवी शास्त्रींनी झहीर खानच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला केलेला विरोध अशी वादाची मालिका सुरु आहे.
त्यातच आता क्रिकेट सल्लागार समिती अर्थात सीएससीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने क्रिकेट प्रशासकीय समिती प्रमुख (सीओए) विनोद राय यांना ई-मेल केला आहे.
या तिघांनी प्रशिक्षक निवड प्रक्रिया, आरोप आणि त्यावरुन होत असलेला 'त्रास' याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे.
त्रिमूर्ती दु:खी
फलंदाजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान हे रवी शास्त्रींवर थोपवण्यात आल्याचं पसरवलं जात आहे. यालाच तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणने आक्षेप घेत दु:ख व्यक्त केलं आहे.
सीओएने सीएससीला केवळ मुख्य प्रशिक्षक नियुक्तीचे अधिकार दिले होते. फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्ती ही त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचं सांगितलं जात आहे किंबहुना तसं पसरवलं जात असल्याचं या त्रिमूर्तींचं म्हणणं आहे.
ई-मेलमध्ये काय म्हटलं आहे?
"आम्ही रवी शास्त्रीसोबत द्रविड आणि झहीर खानच्या नावाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी रवी शास्त्रींनी या नावांना सहमती दर्शवली होती. भारतीय क्रिकेटला सर्वोत्तम कसं करता येईल, त्यासाठीच ही चर्चा झाली. शास्त्रींच्या सहमतीनंतरच द्रविड आणि झहीरच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं", असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.
तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणकडून संयुक्तरित्या हा ई-मेल पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.
याशिवाय या ई-मेलमध्ये असंही म्हटलंय की, "असे संकेत दिले जात आहेत की झहीर आणि द्रविडची नियुक्ती ही आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. अधिकार मर्यादा ओलांडून झहीर आणि द्रविडला थोपवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र आम्ही विनोद राय, राहुल जौहरी आणि अमिताभ चौधरी या सर्वांना बैठकीत काय झालं याबाबतची माहिती दिली होती.
आपल्याला माहित असेलच की आम्ही या प्रक्रियेत भारतीय संघाचं भलं कसं होईल, याच विचाराने जीव लावून काम करत आहोत. भारतीय संघाला जगात दबदबा कसा राखता येईल, विश्वचषक कसा जिंकता येईल हाच आमचा उद्देश आहे.
आमची छबी खराब करुन, मीडियात जाणीवपूर्वक आमच्याबद्दलचं चित्र तयार केलं जात आहे, त्यामुळे आम्ही दु:खी आहोत, नाराज आहोत. त्यामुळे तुम्ही (विनोद राय) याप्रकरणी लक्ष घालून, सर्वप्रकरण प्रकाशझोतात आणावं.
आम्ही तिघे पूर्ण निष्ठेने क्रिकेट खेळलो आहे. आता बीसीसीआयने आमच्यावर सोपवलेली जबाबदारीही त्याच निष्ठेने पार पाडत आहोत. तुम्ही आमचं कौतुक करा अशी आमची इच्छा नाही, पण आमच्याबद्दलचा अपप्रचार थांबवा".
संबंधित बातम्या
गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण हवा, रवी शास्त्रींची मागणी : सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement