एक्स्प्लोर
अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा विजय, चेन्नईला पराभवाचा धक्का
अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सनं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा एक चेंडू आणि चार विकेट्सनी पराभव करून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं.

जयपूर : अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सनं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा एक चेंडू आणि चार विकेट्सनी पराभव करून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. राजस्थान रॉयल्सच्या या विजयात सलामीच्या जॉस बटलरनं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं ६० चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ९५ धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीनं राजस्थानला एक चेंडू राखून १७७ धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानच्या खात्यात आता ११ सामन्यांमध्ये पाच विजयांसह १० गुण आहेत. राजस्थानसह मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यातही पाच विजयांसह १० गुण आहेत. त्यामुळं त्या तीन संघांत प्ले ऑफच्या तिकीटासाठी तीव्र चुरस असणार आहे. तसंच चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असली, तरी प्ले ऑफच्या तिकीटासाठी त्यांना किमान एक विजय मिळवणं आवश्यक आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























