एक्स्प्लोर
Advertisement
फेडरर Vs नदाल, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 8 वर्षांनी दोघं भिडणार
मुंबई : रॉजर फेडरर विरुद्ध राफेल नदाल.. ऑस्ट्रेलियन ओपनमधल्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये टेनिसरसिकांना यंदा दोन महान लढवय्यांमधल्या लढतीची मेजवानी मिळणार आहे. तब्बल आठ वर्षांनी नदाल आणि फेडरर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत भिडणार आहेत.
याआधी 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत नदालनं फेडररला हरवलं होतं. नदालकडून वारंवार पराभव स्वीकारावा लागलेल्या फेडररला तेव्हा अश्रू आवरले नव्हते. भावनावश झालेल्या फेडररला नदालनंच धीर दिला. ते दृष्य पाहून जगभरातले दोघांचेही चाहते गहिवरले होते. फेडरर आणि नदालमधल्या रायव्हलरीला अशा क्षणांनीच एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे.
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल आजवर 34 वेळा टेनिस कोर्टवर आमनेसामने आले होते. त्यात नदालनं तब्बल 23 वेळा तर फेडररनं अकरा वेळा विजय साजरा केला. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या व्यासपीठावर फेडरर आणि नदालमध्ये झालेल्या 11 लढतींपैकी 9 लढती नदालनं जिंकल्या आणि केवळ दोनदा फेडररनं विजय साजरा केला.
फेडरर आणि नदाल आजवर आठवेळा एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर आले होते. त्यात नदालनं सहावेळा फेडररवर मात केली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर नदालनं फेडररविरुद्धच्या तिन्ही लढती जिंकल्या आहेत. पण गेला काही काळ दोघांनाही दुखापतींनी ग्रासलं होतं. त्यामुळे जागतिक क्रमवारीतही दोघांची घसरण झाली.
पुरुष एकेरीच्या क्रमवारीत फेडरर सध्या सतराव्या तर नदाल नवव्या स्थानावर आहे. दोघांनीही दुखापतींमधून सावरुन ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. आता फेडरर त्याच्या कारकीर्दीतलं अठरावं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं करणार, की नदाल त्याच्या पंधराव्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घालणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement