एक्स्प्लोर
फेडरर बाराव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत, नदालचा चार सेट्समध्ये पराभव
तीन तास दोन मिनिटं चाललेल्या उपान्त्य फेरीतील लढतीत टेनिसपटू रॉजर फेडररने 7-6,1-6, 6-3, 6-4 असा नदालवर विजय मिळवला.

विम्बल्डन : स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फेडररने उपान्त्य फेरीत स्पेनच्या राफेल नदालचा चार सेट्समध्ये फडशा पाडला. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत बाराव्यांदा प्रवेश करण्याचा विक्रम फेडररने नोंदवला आहे. आठ वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. तीन तास दोन मिनिटं चाललेल्या या लढतीत फेडररने 7-6, 1-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. या विजयासह फेडररने फ्रेंच ओपनमधल्या पराभवाचा वचपा काढला. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर उद्या (रविवारी) विजेतेपदासाठी फेडरर आणि सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविच यांच्यामध्ये लढत होणार आहे. 2003 पासून 2009 पर्यंत सलग सात वर्ष 37 वर्षीय फेडररने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यानंतर 2012, 2014, 2015, 2017 आणि आता 2019 अशी जवळपास एकआड एक वर्ष तो विम्बल्डनची अंतिम फेरी गाठत आहे. त्यापैकी आठ वेळा त्याने विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. विम्बल्डन ओपनमधील आठ, ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहा, यूएस ओपनमधील पाच आणि फ्रेंच ओपनमधील एक अशी 20 ग्रँडस्लॅम जेतेपदं फेडररच्या नावे आहेत. ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत तो 31 वेळा पोहचला आहे, तर कारकीर्दीत त्याने तब्बल 156 वेळा अंतिम फेरीत लढत दिली आहे.
Roger Federer is back in the Finals!
He defeats Rafael Nadal in four sets to reach his 12th #Wimbledon Final. pic.twitter.com/RXRdsFhNBZ — Sport News (@BestFutbolGoal) July 12, 2019
आणखी वाचा























