एक्स्प्लोर

VIDEO: नजर हटी, दुर्घटना घटी..., पाहा रिषभ पंतचा भन्नाट रनआऊट!

कानपूर: नजर हटी, दुर्घटना घटी... अशी पाटी महामार्गांवर बऱ्याचदा पाहायला मिळते, आणि ही म्हण खुरीसुद्धा आहे. पण फक्त रस्त्यावरच नाही तर खेळाच्या मैदानातही असं घडू शकतं. याचाच प्रतत्य दिल्ली डेअरडेव्हिलसचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतलाही आला. 19 वर्षीय रिषभकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. पण अद्याप अनुभवाची कमी असल्याचं कालच्या सामन्यात दिसून आलं. काल ज्या पद्धतीनं रिषभनं आपली विकेट गमावली ती त्याच्यासाठी नक्कीच धडा शिकवणारी गोष्ट होती. असा बाद झाला रिषभ! कानपूरच्या मैदानात काल (बुधवार) गुजरातनं दिल्लीसमोर 196 धावाचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर संजून सॅमसन झटपट बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून त्यानं आशा उंचवल्या देखील. पण दुसऱ्याच चेंडूवर सगळ्या आशा धुळीसही मिळवल्या... त्याचं नेमकं झालं असं की, रिषभनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर गोलंदाज प्रदीप सांगवाननं दुसऱ्या चेंडू थोडासा लेग साईडला टाकला. चेंडू रिषभच्या पॅडला लागून स्लीपमध्ये असणाऱ्या रैनाकडे गेला. त्याचवेळी गोलंदाजानं एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. तेव्हा रिषभचं सारं लक्ष त्याच्याकडेच गेलं. पंचानी त्याला नाबाद ठरवलं. त्यावेळी करुण नायर धाव घेण्याच्या तयारीत होता. रिषभनं हात दाखवत त्याला थांबण्याचा इशारा केला. पण याचवेळी स्वत: रिषभ मात्र, क्रिझच्या बाहेर होता. हीच संधी रैनानं साधली. रिषभ क्रिझमध्ये नाही आणि त्याची पाठ आपल्याकडे असल्याचं पाहून रैनानं चेंडू थेट स्टम्पवर मारला... अन् इथंच रिषभचा खेळ खल्लास झाला... रिषभनं बॅट क्रिझमध्ये टेकवण्याआधीच रैनानं फेकलेल्या चेंडूनं स्टम्पचा वेध घेतला होता. त्यामुळे पंचांच्या निर्णयाची वाटही न पाहता रिषभनं निमूटपणे पॅव्हेलियनची वाट धरली... रिषभची पुन्हा तशीच चूक! रिषभ अशा पद्धतीनं बाद होणं ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशाच पद्धतीनं बाद झाला होता. मागील वर्षी खेळवण्यात आलेला अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिषभ असाच रनआऊट झाला होता. वेस्टइंडिज विरुद्ध सामन्यात सामन्यातील चौथ्याच चेंडूवर रिषभ रनआऊट झाला होता आणि हाच मॅचचा टर्निंग पॉईंटही ठरला होता. त्यावेळी रिषभ वेगवान गोलंदाजाला क्रिझच्या बाहेर उभा राहून खेळत होता. जोरदार फटका मारण्याचा नादात तो आणखी पुढेही आला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही आणि विकेटकिपरच्या हातात गेला. त्यावेळीही रिषभ बेफिकीरपणे क्रिझच्या बाहेरच उभा होता. विंडीजचा विकेटकिपर इमलाचने चतुरपणे चेंडू थेट स्टम्पवर मारला आणि रिषभला बाद केलं. अंतिम सामन्यात अशापद्धतीनं विकेट गमावल्यानं त्याचा फटका संघाला बसला. अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिजनं पाच गडी राखून जिंकला. VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget