एक्स्प्लोर
Advertisement
रिषभ पंत दुसरा अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंगकडून स्तुतिसुमने
पंत महेंद्रसिंग धोनीच्या तुलनेत जास्त कसोटी शतकं ठोकेल. धोनीने कसोटीत केवळ सहा शतकं ठोकली असून पंत त्याच्यापेक्षाही जास्त शतकं लावेल असा विश्वासही पॉन्टिंगने व्यक्त केला.
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंतच्या फलंदाजीतल्या गुणवत्तेच्या इतक्या प्रेमात पडला आहे की, त्यानं पंतची तुलना थेट अॅडम गिलख्रिस्टशी केली आहे. रिषभ पंतने सिडनी कसोटीत 159 धावांची धडाकेबाज खेळी उभारली होती.
त्याची ही खेळी पाहून प्रभावित झालेला पॉन्टिंग म्हणाला की, पंतमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याच्या भात्यात वैविध्यपूर्ण फटके आहेत. पंतला खेळाची चांगली जाण असल्याचंही मत पॉन्टिंगनं व्यक्त केलं. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पंतला पॉन्टिंगकडून मार्गदर्शन लाभलं होतं. त्यामुळं पंतला यष्टिरक्षणावर थोडी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचंही मत त्यानं बोलून दाखवलं.
पंत हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो चेंडू टोलवण्यातही निपुण आहे. सामना कुठल्या पद्धतीचा आहे याची त्याला चांगली समज आहे. आयपीएलमध्ये दिल्ली संघात तो खेळताना त्याला प्रशिक्षण देता येणे हे माझं भाग्यच आहे, असेही पॉन्टिंग म्हणाला. महेंद्रसिंग धोनीने कसोटीत केवळ सहा शतकं ठोकली असून पंत त्याच्यापेक्षाही जास्त शतकं लावेल असा विश्वासही पॉन्टिंगने व्यक्त केला.
सिडनी कसोटीत पंतने नाबाद 159 धावा लगावल्या. 189 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपले पहिले शतक ठोकत असा पराक्रम करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 2 शतके ठोकली आहेत आणि दोन वेळा नव्वदी गाठली आहे. केवळ 21 व्या वर्षी तो 9 कसोटी सामने खेळला आहे. त्यामुळे त्याची कसोटी कारकीर्द उत्तम असेल’, असा विश्वासही पॉन्टिंगने व्यक्त केला.
'हे' तीन विक्रम करणारा रिषभ पंत पहिला भारतीय खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात रिषभने तीन विक्रम केले. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने सिडनी कसोटीत शतक झळकावून तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. ऑस्ट्रेलियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावांचा फारुख इंजिनियर यांचा विक्रमही त्याने मागे टाकला. फारुख इंजिनियर यांनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना सर्वाधिक 88 धावा केल्या होत्या. इंजिनियर यांचा हा विक्रम पंतने मोडीत काढला आहे. तसेच पंतने सिडनीत नाबाद 159 धावांची खेळी साकारत भारताबाहेर एका डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला. त्याने या कामगिरीसह महेंद्रसिंग धोनीचा 147 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement