एक्स्प्लोर

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा मेंदू, पाठीचा कण्याचा एमआरआय नॉर्मल, जखमांवर प्लास्टिक सर्जरीही झाली, रिपोर्टमधून माहिती 

आज सकाळी रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात रिषभ गंभीर जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

Rishabh Pant Accident:  आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती तीन दुखद बातम्यांनी झाली. पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन झालं. दुसरी बातमी फुटबॉलचे देव पेले यांचं निधन आणि तिसरी बातमी होती भारतीय संघाचा क्रिकेटपटू रिषभ पंतच्या अपघाताची. आज सकाळी रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात रिषभ गंभीर जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या ट्विटनुसार, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे.  चेहऱ्यावरील जखमांसह इतर जखमा आणि ओरखड्यांवर डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी  देखील केली असल्याची माहिती आहे. उद्या शनिवारी ऋषभ पंतचा घोटा आणि गुडघ्याचा एमआरआय होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. पंतच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत आणि उजव्या गुडघ्यात एक लिगामेंट फाटले आहे परंतु सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे बीसीसीआयनं म्हटलं आहे. 

बीसीसीआयनं म्हटलं आहे की, भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे उत्तराखंडच्या रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्षम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यात आले. ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी दुखापत झाली आहे तर गुडघ्याचे एक लिगामेंट फाटले आहे. त्याच्या उजव्या गुडघ्यात आणि त्याच्या उजव्या मनगटात, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीलाही दुखापत झाली आहे.

ऋषभची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. याच ठिकाणी त्याचे एमआरआय काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी  त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता.  यावेळी त्याला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला.  गाडीला आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची विंडोस्क्रीन तोडली. हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक आणि इतरांनी त्याला तिथून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमध्ये एकटाच असलेल्या पंतला डुलकी लागल्यानं आग लागण्यापूर्वी कार डिव्हायडरला धडकली, असंही सिंह यांनी सांगितलं.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Embed widget