भारताला पदकतालिकेत 67 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारताच्या खात्यात एक रौप्य आणि एक कांस्य पदक अशी दोन पदकं जमा आहेत. यातील पीव्ही सिंधूने बॉडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावलं, तर साक्षी मलिक हिने कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
2/7
रिओ ऑलिम्पिक सोहाळ्याची काल मोठ्या उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ‘बाय बाय रिओ’ म्हणत रिओ ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली.
3/7
या स्पर्धेत विविध देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळच्या रिओ ऑलिम्पिकवर पुन्हा एकदा अमेरिकेचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
4/7
अमेरिकेनं 121 पदकं जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. अमेरिकेच्या खात्यात 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्य पदकं जमा झाली आहेत.
5/7
तर ग्रेट ब्रिटननं दुसरं स्थान मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ग्रेट ब्रिटनच्या खात्यात 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 67 पदकं जमा आहेत.
6/7
चीनच्या खेळाडूंनी मात्र यंदा निराशा केली. चीननं 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकूण 70 पदकांसह तिसरं स्थान मिळवलं.
7/7
पदकतालिकेतील टॉप 10 च्या यादीत चीननंतर रशिया, जर्मनी, जपान, फ्रान्स, दक्षिण कोरिया, इटली ऑस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे.