एक्स्प्लोर
ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पाचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
रिओ दी जेनेरिओ: बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीचं रिओ ऑलिम्पिकमधलं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. महिला दुहेरीच्या अ गटात ज्वाला आणि अश्विनीला नेदरलँड्सच्या एफी मुस्केन्स आणि सेलेना पिएक या जोडीकडून 16-21, 21-16, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
ज्वाला आणि अश्विनीला आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीचा मुकाबला करायचा आहे. पण साखळी फेरीतले दोन सामने गमावल्यामुळं ज्वाला-अश्विनीला अ गटात टॉप टूमध्ये स्थान मिळू शकणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळं ज्वाला आणि अश्विनीचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे.
दरम्यान, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाला सलामीच्या लढतीत जपानच्या मिसाकी मात्सुतोमो आणि अयाका ताकाहाशी या जोडीनं 21-15, 21-10 असं हरवलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement