एक्स्प्लोर
VIDEO : मैदानातच अंपायरचा डान्स, जाडेजालाही हसू अनावर!
मैदानावर फक्त खेळाडूच नाही तर चक्क अंपायरच डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील नक्कीच हसू येईल.
मुंबई : क्रिकेट सामन्यात बऱ्याचदा खेळाडू मैदानावर मजा-मस्ती करतात. अनेकदा विकेट घेतल्यानंतर किंवा शतक झळकावल्यानंतर खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा करतात. पण मैदानावर फक्त खेळाडूच नाही तर चक्क अंपायरच डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील नक्कीच हसू येईल.
एका स्थानिक किक्रेट सामान्यात अंपायरनं बॉलिवूड गाण्यांवर मैदानातच ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजानं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
जाडेजानं जेव्हा हा व्हिडीओ शेअर केला त्यावेळी त्यानं असंही म्हटलं की, 'अरे देवा... माझं हसू अजूनही थांबत नाही.'
VIDEO :
दरम्यान, जाडेजाची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात निवड झालेली नाही. मात्र, हा व्हिडीओ शेअर करुन त्यानं आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement