एक्स्प्लोर
धोनीवर काही लोक प्रचंड जळतात : रवी शास्त्री
'धोनीच्या प्रगतीवर जळणारे त्याचा मत्सर करणारे अनेक लोक आहेत. पण धोनी एक महान खेळाडू आहे. त्यामुळे कुठं थांबायचं हे तो स्वत: ठरवेल.'
मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीवरुन सध्या त्याच्यावर बरीच टीका सुरु आहे. पण दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीनं त्याची पाठराखण केली आहे. तर आता संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनंही धोनीला पाठिशी घातलं आहे. त्याचवेळी त्यानं त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही उत्तरही दिलं आहे.
'धोनी खराब खेळावा आणि त्याचं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर लवकर संपावं असं त्याचा मत्सर करणाऱ्या लोकांना वाटतं.' एबीपी न्यूजशी बोलताना शास्त्रीनं हे मत मांडलं.
'धोनीच्या प्रगतीवर जळणारे त्याचा मत्सर करणारे अनेक लोक आहेत. पण धोनी एक महान खेळाडू आहे. त्यामुळे कुठं थांबायचं हे तो स्वत: ठरवेल.' असंही शास्त्री यावेळी म्हणाला.
'धोनीची किंमत काय आहे ते संघाला माहित आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर होणाऱ्या टीकेचं काहीही वाटत नाही.' असंही तो पुढे म्हणाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धोनी टी-20 संघात असावा की नाही याबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यालाच शास्त्रीनं उत्तर दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement