एक्स्प्लोर
विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकणार?
विदर्भाने रणजी करंडकाच्या फायनलवर चौथ्या दिवसअखेर घेतलेल्या घट्ट पकडीचं श्रेय प्रामुख्याने डावखुरा स्पिनर आदित्य सरवटेला द्यावं लागेल.
नागपूर : फैझ फझलच्या विदर्भाला यंदा सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी करंडकाच्या फायनलमध्ये विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राची चौथ्या दिवसअखेर 5 बाद 58 अशी दाणादाण उडाली आहे.
त्याआधी, या सामन्यात विदर्भाने आदल्या दिवशीच्या 2 बाद 55 धावांवरुन दुसऱ्या डावात सर्व बाद 200 धावांची मजल मारली. आदित्य सरवटेने 48, मोहित काळेने 38 आणि गणेश सतीशने 35 धावांची खेळी करुन विदर्भाला 200 धावांची मजल मारुन दिली. आज या सामन्याचा अखेरचा दिवस असून, सौराष्ट्राला विजयासाठी आणखी धावा करण्याची आवश्यकता आहे. पण सौराष्ट्राच्या हाताशी केवळ पाच विकेट्स आहेत.
विदर्भाने रणजी करंडकाच्या फायनलवर चौथ्या दिवसअखेर घेतलेल्या घट्ट पकडीचं श्रेय प्रामुख्याने डावखुरा स्पिनर आदित्य सरवटेला द्यावं लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल 521 धावांचा रतीब घालणारा चेतेश्वर पुजारा रणजी फायनलच्या दोन्ही डावांत मिळून केवळ एकच धाव करु शकला. पुजारा दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाल्याने रणजी फायनलचं पारडं सध्या विदर्भाच्या बाजूने झुकलं आहे. आदित्य सरवटेने त्याला दोन्ही डावांत माघारी धाडलं. पहिल्या डावात पुजाराने एक धाव करुन स्लीपमध्ये वासिम जाफरच्या हाती झेल दिला. दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. आदित्य सरवटेने त्याला पायचीत केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement