एक्स्प्लोर
पुणेरी पलटणचं जबरदस्त कमबॅक, बंगाल विरुद्धचा सामना टाय!

प्रो कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण संघामधला सामना 34-34 असा बरोबरीत सुटला. यंदाच्या मोसमातला बरोबरीत सुटलेला हा तिसरा सामना ठरला.
खरं तर या सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांपर्यंत बंगाल वॉरियर्सकडे 11-4 अशी सात गुणांची आघाडी होती. पण त्यानंतर पुणेरी पलटणनं जबरदस्त कमबॅक करुन बंगाल वॉरियर्सला 34-34 असं बरोबरीत रोखलं. या सामन्यात पुणेरी पलटणसाठी दीपक हुडानं सर्वाधिक आठ गुणांची कमाई केली. तर बंगाल वॉरियर्ससाठी विशाल मानेनं पकडीत सहा गुण वसूल केले.
बंगालविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यानं पुणेरी पलटणनं गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. बंगाल वॉरियर्स गुणतालिकेत अजूनही तळाशी म्हणजेच आठव्या स्थानावर रेंगाळत आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement






















