एक्स्प्लोर
कर्नाटकच्या शिवय्यावर मात, पुण्याचा अभिजीत कटके भारत केसरी!
पुण्याच्या अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर 10-2 अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला.

पुणे : पुण्याचा तरुण पैलवान अभिजीत कटके कर्नाटकातल्या जामखंडीत भारत केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर 10-2 अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला. 51 हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन अभिजीतल गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे या स्पर्धेतल्या पाचही कुस्त्यांमध्ये अभिजीतनं अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. अभिजीत कटकेनं गेल्या वर्षी पदार्पणातच उपमहाराष्ट्र केसरी व उपहिंद केसरी किताबांचा मान मिळवला होता. 2016 साली फ्रान्समध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र






















