एक्स्प्लोर

पृथ्वी शॉ दुलीप करंडकात शतक ठोकणारा सर्वात तरुण क्रिकेटर

दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळताना शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.

लखनौ : मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने दुलीप करंडकात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 25 सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळताना पहिल्याच दिवशी त्याने शतक ठोकलं. दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो सर्वात तरुण क्रिकेटर ठरला आहे. मुंबईकर पृथ्वी शॉ केवळ 17 वर्षांचा आहे. इंडिया रेडकडून खेळताना त्याने अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केलं. लखनौत खेळवल्या जात असलेल्या दुलीप करंडकात इंडिया रेड आणि इंडिया ब्ल्यू यांच्यात डे-नाईट अंतिम सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून अगोदर फलंदाजी करताना इंडिया रेडने 89 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि पृथ्वी शॉ यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. पृथ्वी शॉने 2016-17 च्या रणजी मोसमातल्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरूद्ध रणजी स्पर्धेत पदार्पण केलं होतं. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शानदार शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता दुलीप करंडकामध्येही त्याने पदार्पणातच शतक पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही रणजी, दुलीप आणि इराणी करंडक या देशातल्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे रणजी आणि आता दुलीप करंडकात शतक ठोकून पृथ्वी सचिनच्या या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. पृथ्वी शॉने यापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंग्लंड-अ विरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना त्याने दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक 250 धावा कुटल्या होत्या. 2013 साली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील हॅरिस शील्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट फ्रान्सिस संघाविरुद्ध खेळताना पृथ्वी शॉने 330 चेंडूंमध्ये 546 धावा फटकावण्याचा पराक्रम केला होता. या खेळीनंतरच तो चर्चेत आला. या खेळीदरम्यान त्याने तब्बल 85 चौकार आणि 5 षटकार ठोकले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2026-27 : विषयच खोल! मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचल टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय
विषयच खोल! मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचल टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय
Hardik Pandya News : हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
IND vs NZ 1st T20 : गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
IND vs NZ 1st T20 Live Streaming : JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z
JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Satara DCC Bank Election : रामराजे ते शिवेंद्रराजे,सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
Embed widget