एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून पाकिस्तानी खेळाडूंना मैदानात पुश-अप मारण्यास बंदी
लाहोर: पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ने बुधवारी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना सामन्यातील विजयानंतर पुश-अप मारण्यास बंदी घातली आहे. यासाठी पाकिस्तानी राजकीय नेत्यांकडून पीसीबीवर दबाव वाढत होता, त्यानंतर संसदेच्या एका समितीला पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ही माहिती दिली.
जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर कर्णधार मिस्बाह-उल-हकने पहिल्यांदा पुश-अप मारले होते. यानंतर कर्णधार मिसबाहचे अनुकरण करत, टीमच्या इतर खेळाडूंनीही लॉर्डसमधील कसोटी सामन्यातील विजयानंतर अशा प्रकारचे पुश-अप मारले.
पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने याबाबचे वृत्त प्रकाशित केलं आहे. डॉनच्या वृत्तानुसार, देशाअंतर्गत समन्वय समितीच्या एका बैठकीवेळा राजकीय नेत्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंना पुश-अप मारण्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते. यावर पीसीबीने स्पष्टीकरण देताना ही कारवाई केल्याचे सांगितले.
मिस्बाहला त्याच्या या कृत्यावरुन त्याला जाब विचारला असता, पाकिस्तानी सैन्यदलाला दिलेल्या वचनाची पुर्ताता केल्याचे त्याने सांगितले. तो म्हणला की, ''आम्ही लाहोरमध्ये झालेल्या स्किल कॅम्पपूर्वी अबोटाबादमधील एका शिबीरात भाग घेतला. तिथे आम्ही मैदानात उतरण्यापूर्वी सन्मान देण्यासाठी 10 पुश-अप मारले होते. त्यानंतर मी शतक झळकावल्यानंतर, असेच पुश-अप मारण्याचे सैनिकांना वचन दिले होते.''
मात्र, पाकिस्तानातील राजकीय नेत्यांना मिस्बाहची ही कृती खटकल्याने, त्यांनी यावर टीकेची झोड उठवत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement