Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं
Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
Babar Azam : अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा (PAKISTAN) एक विकेटने विजय झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 300 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने 9 विकेट्स गमावून लक्ष्याला गवसणी घातली. या सामन्यात बाबर आझमने (Babar Azam) कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकलं आहे.
100 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम
100 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्ता क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने विवियन रिचर्ड्स यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूला मागे टाकलं आहे. बाबरने 100 वनडे डावांमध्ये 5142 धावा केल्या आहेत. यामध्ये हाशिम अमला दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 4046 धावा केल्या आहेत. तर रिचर्ड्स 4606 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
100 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली फारच मागे आहे. तो नवव्या स्थानावर आहे. कोहलीने 4230 धावा केल्या आहेत. तर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 4343 धावा केल्या. शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे. ज्यो रुट पाचव्या स्थानावर आहे. त्याने 4428 धावा केल्या आहेत. शाय होप 4436 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
Skipper Babar Azam makes another record in ODI cricket 🔥#PakvsAfg #BabarAzam pic.twitter.com/143BrvAdAS
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) August 24, 2023
अफगाणिस्तानच्या गुरबाजची शानदार खेळी पण...
तत्पूर्वी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने (Afghanistan Vs Pakistan) 300 धावा केल्या. संघाच्या गुरबाजने 151 धावांची शानदार खेळी रचली. त्याने 151 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 3 षटकार लगावले. इब्राहिम जादरानने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. या उत्तरादाखल पाकिस्तानने 49.5 षटकात लक्ष्य गाठलं. पाकिस्तानसाठी इमाम-उल-हकने 91 धावा केल्या. बाबरने 66 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. शादाब खानने 35 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या. तर नसीम शाहने नाबाद 10 धावा केल्या, त्याने दोन चौकार ठोकले.
पाकिस्तानची मालिकेत विजयी आघाडी
दरम्यान, तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने पहिला सामना 142 धावांनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात एक विकेटने विजय मिळवला. तिसरा सामना आता 26 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. हा सामना कोलंबोमध्ये आयोजित केला जाणार आहे.
हेही वाचा
रहमानउल्ला गुरबाजनं मोडला धोनीचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड; पाकिस्तानविरुद्ध केली धडाकेबाज कामगिरी