एक्स्प्लोर

पिच क्युरेटर स्टिंग : पुण्याचं पिच कसं आहे?

बुकी बनून गेलेल्या पत्रकारांनी सामन्याआधी पिचसोबत छेडछाड करण्याची परवानगी देताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना रंगेहाथ पकडलं.

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुण्यातील वन डे सामना संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पिच फिक्सिंगवर 'आजतक'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेटविश्व हादरलं आहे. त्यामुळे आज सामना होणार की हे अजून स्पष्ट नाही. बीसीसीआय याचा निर्णय घेईल. आयसीसीचे सामनाधिकारी यावर विचार करतील, असं बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितलं. बुकी बनून गेलेल्या पत्रकारांनी सामन्याआधी पिचसोबत छेडछाड करण्याची परवानगी देताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना रंगेहाथ पकडलं. मागणीनुसार पिच बनवून दिलं जाईल, असं साळगावकर कॅमेऱ्यावर बोलले. दोन खेळाडूंना पिचवर बाऊन्स हवाय, हे होऊ शकतं का, असं पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी 'होऊन जाईल,' असं उत्तर दिलं. दरम्यान बीसीसीआयने पांडुरंग साळगावकर यांचं निलंबन केलं आहे. पुण्याचं पिच कसं आहे? पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं पिच फिरकी गोलंदाजांसाठी चांगलं समजलं जातं. इथे गोलंदाजांना मदत मिळते. मागच्या वेळी इथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र पुण्याचं पिचवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल जेवढा वळत होता, तेवढा आता वळणार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही संघ पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेईल, कारण संध्याकाळी दव पडतं, त्यावर सामन्याचा निकाल ठरु शकतो. पिच वाद आणि पांडुरंग साळगावकर पिचसंदर्भात पांडुरंग साळगावकर वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी बनवलेल्या पिचवरुनही मोठा वाद झाला होता. आयसीसीने यंदाच भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यानंतर हे पिच 'खराब' असल्याचं म्हटलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 333 धावांनी पराभूत केलं होतं. भारतीय संघाने दोन्ही सामन्यात अनुक्रमे 105 आणि 107 धावा केल्या होत्या आणि सामना तीन दिवसांतच संपला होता. कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले? पत्रकाराने पिच क्युरेटरला आपल्या दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये काही बदल करण्यास सांगितलं, त्यावर पांडुरंग साळगावकर लगेचच तयार झाले. जे पिच आम्ही तयार केलंय, त्यावर 337 धावसंख्या होऊ शकते. या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करता येऊ शकतो, असं पिच क्युरेटर म्हणाले. रिपोर्टरच्या सांगण्यावरुन पांडुरंग साळगावकर त्यांना पिच दाखवण्यासही तयार झाले. मात्र नियमानुसार, सामन्याआधी पिचवर कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. तसंच मी काही मिनिटांत पिचचं स्वरुप बदलू शकतो, असंही पिच क्युरेटर म्हणाले. पिचवर जर थोडी माती किंवा पाणी टाकलं किंवा पिचवर बुटं घासली तरी पिच खराब होऊ शकते. इतकंच नाही तर खिळे असलेले शूज घालून पिचवर जाण्यासही त्यांनी परवानगी दिली. कोण आहेत पांडुरंग साळगावकर? पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले. साळगावकरांनी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. 1971-72 या पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये साळगावकरांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी कपमध्येही त्यांनी ‘रेस्ट ऑफ इंडिया’साठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहेत. अजित वाडेकरांसह सहा विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. जानेवारी 1974 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1974-75 मध्ये दलिप ट्रॉफीच्या उपान्त्य सामन्यात इस्ट झोनचा त्यांनी धुव्वा उडवला. 1974-75 नंतर ते फक्त महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. 1980-81 मध्ये बडोद्याविरुद्ध त्यांनी ठोकलेलं शतक हे त्यांच्या कारकीर्दीचं हायलाईट म्हणता येईल. निवृत्तीनंतर साळगावकर पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. सध्या ते पुण्यातील ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम’चे मुख्य पीच क्युरेटर आहेत. महाराष्ट्र रणजी टीमचे मुख्य निवडकर्ते म्हणून काम पाहिलं आहे. भारतासाठी सामना जिंकणं आवश्यक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना आज दुपारी 1.30 वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईतील सामन्यात सहा विकेट्सनी पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघावर मालिका गमावण्याचं वादळ घोंघावत आहे. विराट ब्रिगेडसाठी या सामन्यात ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पुणे वन डेमध्ये विजय आवश्यक आहे. कागदावर न्यूझीलंडचा संघ टीम इंडियापेक्षा कमकुवत वाटत असला तरी मैदानावर कोणत्याही संघाला पराभूत करण्याची धमक त्यांच्यात आहे, हे मुंबईतील सामन्यातून दिसलं आहे. संबंधित बातम्या पिच क्युरेटर साळगावकरांचं धक्कादायक स्टिंग, आजचा सामना रद्द होणार? खिळ्याचे शूज घालून पिचवर, कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले? पिच क्युरेटरचं स्टिंग, कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार

व्हिडीओ

Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Embed widget