(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olympics : भारताच्या लेकींचं पराभवानंतरही कौतुक, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत संघाचं कौतुक केलं आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले. भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत संघाचं कौतुक केलं आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनचा 4-3 नं मिळवला विजय
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आपण महिला हॉकीत पदक मिळवू शकलो नाही. मात्र ही टीम न्यू इंडियाची भावना दर्शवते, आपण सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑलिम्पिकमधील भारतीय महिला संघाचं हे यश भारताच्या मुलींना हॉकी खेळाकडे आकर्षित करायला प्रेरित करणारी आहे. आम्हाला संघाचा गर्व आहे. मोदींनी म्हटलं आहे की, आम्ही महिला हॉकी टीमच्या या शानदार खेळीला नेहमी लक्षात ठेवू. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. टीमच्या प्रत्येक सदस्याचं योगदान उल्लेखनीय आहे. भारताच्या शानदार संघाचा गर्व आहे.
We narrowly missed a medal in Women’s Hockey but this team reflects the spirit of New India- where we give our best and scale new frontiers. More importantly, their success at #Tokyo2020 will motivate young daughters of India to take up Hockey and excel in it. Proud of this team.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटननं आक्रमक खेळी केली. ब्रिटननं सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं सलग तीन गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. मात्र ही आघाडी भारतीय महिलांना टिकवता आली नाही. ब्रिटननं पुन्हा वापसी करत सलग दोन गोल डागले आणि 4-3 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत गेल्यावेळच्या गोल्ड मेडल विनर ग्रेट ब्रिटननं कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली होती. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला होता. भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 ने पराभूत व्हावे लागले होते.