एक्स्प्लोर

Neeraj Chopra: 'सुवर्णफेक' करणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधींच्या इनामासह 'ही' खास बक्षीसं

Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर  म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. 
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणं आवश्यक असतं. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही सोबत असतात. यात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होतोय.  

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल?

नीरज चोप्राला हरियाणा सरकारनं 6 कोटी रुपयांसह क्लास वन अधिकारी पदावर सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.   पंजाब सरकारकडून देखील नीरज चोप्राला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.  सोबतच  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नीरजचं कौतुक करत एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईनं देखील एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला नवीन लॉन्च होत असलेली   एसयूवी 700 गिफ्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. 

ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर सुवर्ण पदक

ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत. 

पदक जिंकणाऱ्या अन्य खेळाडूंवरही बक्षिसांचा वर्षाव

रवी दहिया
रवी दहियावर रौप्य जिंकल्यानंतर बक्षिसांचा पाऊस सुरू झाला आहे. हरियाणा सरकारने 4 कोटी रुपये रोख जाहीर केले आहेत. सोबतच क्लास वन ऑफिसर बनवले असून प्लॉटवर 50 टक्के सूट दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्यांसाठी एक नवीन योजना लागू केली होती. या योजनेनुसार रवी दहियाला रौप्य पदकासाठी 50 लाख रुपये मिळतील.

मीराबाई चानू
ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये देशाला आणखी एक रौप्य पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूलाही मणिपूर सरकारने अनेक बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. मणिपूर सरकारने मीराबाई चानूला एएसपी बनवले आहे. याशिवाय तिला एक कोटी रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. चानूला केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये मिळतील.

पीव्ही सिंधू
सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूवरही बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 30 लाखांचे रोख अनुदान जाहीर केले आहे, तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 25 लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. केंद्र सरकारकडूनही कांस्य जिंकल्यामुळे सिंधूला 30 लाख रुपये मिळतील.

भारतीय पुरुष हॉकी टीम
भारतीय पुरुषांनी 1980 नंतर हॉकीमध्ये देशातील पहिले पदक जिंकले. आता हरियाणा, पंजाब आणि रेल्वेने हॉकीपटूंना बक्षिसे दिली आहेत. पंजाब सरकारने हॉकीमध्ये कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर हरियाणाने प्रत्येक खेळाडूला 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला रेल्वे 1-1 कोटी रुपये देईल
हरियाणाने कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला क्रीडा विभागात नोकरी आणि सवलतीच्या दरात भूखंड देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रेल्वेने कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget