Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
आपण आपल्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू शकलो आणि ते (भारतीय संघ) यायला तयार नसतील तर त्यांनी अधिक महसूल वाटून घ्यावा. ही चांगली मागणी असल्याचे शोएब अख्तर म्हणाला.
Shoaib Akhtar on Team India : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण वादावर खूश नाही. ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली असली तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याला मान्यता देण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. पीसीबीला ही स्पर्धा संपूर्ण पाकिस्तानमध्ये आयोजित करायची होती, परंतु आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका मवाळ झाली आहे. त्याचवेळी पीसीबी आता भारतात होणाऱ्या आयसीसीच्या सर्व स्पर्धाही हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवल्या जाव्यात अशी मागणी करत आहे.
पाकिस्तानला अधिक महसूल मिळायला हवा
अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सहमत आहे की ही स्पर्धा आता हायब्रीड मॉडेलमध्ये होणार असल्याने पाकिस्तानला अधिक महसूल मिळायला हवा. पण, भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानने भारताचा दौरा करू नये हे त्याला मान्य नाही.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तर म्हणतो, 'तुम्हाला होस्टिंगचे अधिकार आणि कमाई मिळत आहे, हे ठीक आहे. पाकिस्तानची मागणीही रास्त आहे. त्यांनी ठाम भूमिका ठेवायला हवी होती. जर आपण आपल्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू शकलो आणि ते (भारतीय संघ) यायला तयार नसतील तर त्यांनी अधिक महसूल वाटून घ्यावा. ही चांगली मागणी आहे.
Hybrid Model pehle decide ho gaya tha. Shoaib Akhtar
— iffi Raza (@Rizzvi73) December 1, 2024
VC PTV sports official pic.twitter.com/6nZEthwHH3
'भारतात खेळा आणि तिथे त्यांना हरवून परत या'
पण, पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा, असेही अख्तरचे मत आहे. शोएब अख्तर पुढे म्हणाला, 'भविष्यात भारतात खेळायचे झाल्यास मैत्रीचा हात पुढे करून तिकडे जायला हवे. माझा नेहमीच विश्वास आहे की भारतात जा आणि तिथे त्यांचा पराभव करा. 'भारतात खेळा आणि तिथे त्यांना हरवून परत या'.
भारताचे सामने दुबईत होऊ शकतात
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबईमध्ये आयोजित केले जातील, तर उपांत्य फेरी (भारत जिंकल्यास) आणि अंतिम (भारत जिंकल्यास) तेथे खेळले जाऊ शकतात. जर भारत बाद फेरीत पोहोचला नाही तर उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये होतील.
इतर महत्वाच्या बातम्या