नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
Nitin Gadkari : लोकसभेतील सचिवालयाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या खुर्चीत अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र, टीका होण्याची शक्यता असल्यानं पुन्हा निर्णय बदलला आहे.
Nitin Gadkari : लोकसभेतील (Loksabha) सचिवालयाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या खुर्चीत अदलाबदल करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) शेजारी बसणाऱ्या गडीकरींना 58 व्या क्रमांकांवर पाठवले होते. मात्र, टीका होण्याची शक्यता लक्षात घेता गडकरींना पुन्हा पुढे आणले गेले आहे. आज नितीन गडकरी यांना आसन क्रमांक 58 देण्यात आला होता, त्यामुळं गडकरी आता चौथ्या रांगेतील पहिल्या बाकावर बसले असते. नितीन गडकरी यांचा आसन क्रमांक 4 होता त्यामुळं गडकरी दुसऱ्या रांगेत पहिल्या बाकावर बसायचे. आता पुन्हा गडकरी यांचा आसनक्रमांक पुर्ववत म्हणजेच 4 निश्चित करण्यात आला आहे.
सध्या संसेदचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. अधिवेशनात संसदेतील कोणत्या खुर्चीवर कोण बसणार याबाबतची माहिती आधीच देण्यात येत असते. प्रत्येक सदस्याला खुर्चीचा क्रमांक दिलेला असतो. कोणत्या रो मध्ये सदस्य कुठे बसणार याची माहिती लोकसभेतील सचिवालयाकडून देण्यात येते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बसण्याची जागा ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी होती. पण त्यांना 4 थ्या क्रमांकावरुन 58 व्या क्रमांकाचे आसन देण्यात आले होते. मात्र, टीका होण्याची शक्यता लक्षात येतात पुन्हा त्यांची आसन व्यवस्था पुर्ववत करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari : निवडणूक आयोगाची सिस्टीम बरोबर नाही, काँग्रेसच्या नितीन राऊत पाठोपाठ नितीन गडकरी यांचा संताप; म्हणाले.....