Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल?
Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंवर आता बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे.
Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणं आवश्यक असतं. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही सोबत असतात. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकारकडून काय मिळेल हे जाणून घ्या.
रवी दहिया
रवी दहियावर रौप्य जिंकल्यानंतर बक्षिसांचा पाऊस सुरू झाला आहे. हरियाणा सरकारने 4 कोटी रुपये रोख जाहीर केले आहेत. सोबतच क्लास वन ऑफिसर बनवले असून प्लॉटवर 50 टक्के सूट दिली आहे.
रवी दहिया
2015 मध्ये, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्यांसाठी एक नवीन योजना लागू केली होती. या योजनेनुसार रवी दहियाला रौप्य पदकासाठी 50 लाख रुपये मिळतील.
मीराबाई चानू
ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये देशाला आणखी एक रौप्य पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूलाही मणिपूर सरकारने अनेक बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. मणिपूर सरकारने मीराबाई चानूला एएसपी बनवले आहे. याशिवाय तिला एक कोटी रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. चानूला केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये मिळतील.
पीव्ही सिंधू
सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूवरही बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 30 लाखांचे रोख अनुदान जाहीर केले आहे, तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 25 लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. केंद्र सरकारकडूनही कांस्य जिंकल्यामुळे सिंधूला 30 लाख रुपये मिळतील.
भारतीय पुरुष हॉकी टीम
भारतीय पुरुषांनी 1980 नंतर हॉकीमध्ये देशातील पहिले पदक जिंकले. आता हरियाणा, पंजाब आणि रेल्वेने हॉकीपटूंना बक्षिसे दिली आहेत. पंजाब सरकारने हॉकीमध्ये कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर हरियाणाने प्रत्येक खेळाडूला 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला रेल्वे 1-1 कोटी रुपये देईल
हरियाणाने कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला क्रीडा विभागात नोकरी आणि सवलतीच्या दरात भूखंड देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रेल्वेने कांस्य जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.