एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम

MHADA Kokan Mandal Lottery : म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर योजनेतील सदनिका विक्रीच्या वाढीसाठी 02 ते 11 डिसेंबर दरम्यान मोहीम राबवण्यात येत आहे. 

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व ऑनलाइन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शनासाठी दि. ०२ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.  
          
श्रीमती गायकर म्हणाल्या की, मंडळातर्फे राबविल्या जाणार्‍या या मोहिमेअंतर्गत म्हाडा कोंकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) या तत्त्वावरील विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणे व https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी २९ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीपत्रक वाटप व पथनाट्य सादरीकरण केले जात आहे.

म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील सदनिकांच्या ऑनलाइन विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला ११ ऑक्टोबर २०२४ पासून प्रारंभ झाला आहे. श्रीमती गायकर म्हणाल्या की, वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर या महानगरपालिकांच्या कार्यालयात सदर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांत व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महापे एमआयडीसी मधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

विरार येथील जीवदानी देवी मंदिर, विरार चर्च, वसई चर्च या गर्दीच्या ठिकाणी तसेच विरार रेल्वे स्थानक, वसई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वाशी, पनवेल, डोंबिवली, कर्जत, कल्याण या रेल्वे स्थानकांवरही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले असल्याचे श्रीमती गायकर यांनी सांगितले. या मोहिमेचा भाग म्हणून १० रिक्षांमधून प्रकल्पांची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.    

म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विक्रीविना पडून असलेल्या सदनिका विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव  जयस्वाल यांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर मोहीम या त्याचा भाग आहे. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वानखडे यांनी केले.  

म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी म्हणाले की, या सर्व प्रकल्पांमध्ये २४ तास पाणीपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट व कॉमन पॅसेज आहेत. सर्व वसाहतीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उपलब्ध आहे.

काय असणार स्टॉल्सवर?

या प्रत्येक स्टॉलवर मंडळाचा एक कर्मचारी असणार आहे. सदर कर्मचाऱ्यामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेतील म्हाडा कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांची संपूर्ण माहिती, योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत माहिती व सहाय्य, अर्ज नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती तात्काळ दिली जात आहे. अर्ज नोंदणी करतेवेळी येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरणही संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. सदर अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वयाकरिता म्हाडा कार्यालयात एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे. 

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांचा तपशील

  • विरार बोळींज - १७४ (पीएमवाय)  
  • विरार बोळींज - ४१६४ 
  • खोणी-कल्याण - २६२१
  • शिरढोण-कल्याण- ५७७४
  • गोठेघर-ठाणे- ७०१
  • भंडार्ली-ठाणे- ६१३
  • एकूण - १४,०४७

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 Dec 2024 : 5 PmSub District Election Officer On EVM : मतं पडताळणीची नेमकी प्रक्रिया काय? कोण करु शकतो अर्ज?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 02 December 2024Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Australia vs India, 2nd Test : टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Embed widget