एक्स्प्लोर

Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू

Guinea Football Match : घटनेची माहिती देताना स्थानिक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात मृतदेह रांगेत पडलेले आहेत. बाकीचे कॉरिडॉरमध्ये जमिनीवर पडलेले आहेत. शवगृह सुद्धा भरले आहे.

Guinea Football Match : आफ्रिकन देश गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जेरेकोर येथे रविवारी फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, रविवारी लबे आणि गेरेकोर फुटबॉल संघांमध्ये सामना सुरू होता. यादरम्यान मॅच रेफरीने वादग्रस्त निर्णय दिला, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी होत असल्याचे पाहून प्रेक्षकही मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केला.

पोलिस स्टेशनची तोडफोड करत आग लागली 

एएफपीच्या वृत्तानुसार, लोकांनी N'Zérékor मधील पोलिस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली. या घटनेची माहिती देताना स्थानिक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात मृतदेह रांगेत पडलेले आहेत. बाकीचे कॉरिडॉरमध्ये जमिनीवर पडलेले आहेत. शवगृह सुद्धा भरले आहे. हा सामना गिनी आर्मी आर्मी जनरल मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता. 2021 मध्ये गिनीमध्ये झालेल्या सत्तापालटात डुम्बौया यांनी सत्ता काबीज केली.

स्वत:ला लष्करी जनरल घोषित केले

डुम्बौया यांनी सप्टेंबर 2021 मध्ये अध्यक्ष अल्फा कोंडे यांचे सरकार पाडले आणि स्वत: सत्ता घेतली. आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांनी 2024 च्या अखेरीस निवडणुका होतील असे सांगितले होते, परंतु आतापर्यंत निवडणुका होण्याची शक्यता नाही. डुम्बौया यांनी जानेवारी 2024 मध्ये कर्नल ते लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती घेतली होती. गेल्या महिन्यात स्वत:ला गिनीचा सेनापती म्हणून घोषित केले. डुम्बौया यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, डुम्बौया पुढील वर्षी निवडणुका घेऊ शकतात. डोंबुयाही निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी ते देशाच्या विविध भागात फुटबॉल स्पर्धा आयोजित करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्येही हिंसाचार 

इंडोनेशियामध्ये 2022 मध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. त्यानंतर फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 174 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन पोलिसांनाही प्राण गमवावे लागले. सामन्यादरम्यान, संघ हरल्यानंतर त्याचे चाहते मैदानात उतरले. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. हा सामना अरेमा फुटबॉल क्लब आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात होता. सामन्यादरम्यान सुमारे 42 हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. हे सर्व प्रेक्षक अरेमा फुटबॉल क्लबचे चाहते होते. आयोजकांनी पर्सेबाया सुरबाया चाहत्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून येण्यास बंदी घातली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget