Neeraj Chopra Update: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सर्वात मोठ्या पुरस्काराच्या शर्यतीत
Neeraj Chopra : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने मागील काही काळात अनेक मोठ-मोठे पुरस्कार मिळवले आहेत. आता आणखी एका मोठ्या पुरस्कारासाठी त्याला नामांकित करण्यात आलं आहे.
Neeraj Chopra Update: भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 2021 साली पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) इतिहास रचला. 24 वर्षीय नीरजने ऑगस्ट, 2021 मध्ये पार पडलेल्या टोक्यो आॉलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं होतं. त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. भारत सरकारनेही त्याला खेलरत्न सारखं मानाचा पुरस्कार दिला. पण आता जगातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नीरजला नामांकन मिळालं आहे. नीरज चोप्राने 87.58 मीटर इतका लांब भाला फेकत सुवर्णपदक मिळवलं असून त्याच्यासोबत या पुरस्काराच्या शर्यतीत विविध क्रिडाक्षेत्रातील आणखी पाच मानाच्या खेळाडूंना नामांकित करण्यात आलं आहे. नीरजने स्वत: याबाबत ट्वीट देखील केलं आहे.
सहा खेळाडूंना नामांकन
या मानाच्या पुरस्काराच्या शर्यतीत नीरजसह आणखी पाच खेळाडू आहेत. ज्यामध्ये रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदव आहे. नुकताच त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलपर्यंत धडक घेतली होती. तसचं ब्रिटनची 19 वर्षीय टेनिसपटू एम्मा राडुकानू नामांकित आहे. तसंच स्पेनचा फुटबॉलपटू आणि बार्सिलोना संघाकडून खेळणारा 19 वर्षीय पेड्री हाही यामध्ये आहे. यासोबत टोक्यो ओलिम्पिकमध्ये 2 गोल्डसह एकूण 4 पदकं मिळवणारी ऑस्ट्रेलियाची 21 वर्षीय जलतरणपटू आरियार्न टिटमस तसंच वेनेजुएलाची 26 वर्षीय यूलिमार रोहास ही देखील नामांकित आहे. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ट्रिपल जंपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.
हे ही वाचा-
- Neeraj Chopra : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा पदक; प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान
- Khel Ratna Award : ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रासह 12 खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान
- Neeraj Chopra : उद्योगपती आनंद महिंद्रांकडून नीरज चोप्राला खास गिफ्ट, नीरजनं मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha