Neeraj Chopra : उद्योगपती आनंद महिंद्रांकडून नीरज चोप्राला खास गिफ्ट, नीरजनं मानले आभार
Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून अजूनही कौतुक होत आहे. त्याला आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक वचन दिलं होतं
Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून अजूनही कौतुक होत आहे.नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. त्याच्या या सुवर्ण कामगिरीमुळं त्याला अनेक जाहीराती देखील मिळू लागल्या आहेत. दरम्यान त्यानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्याला उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी एक वचन दिलं होतं. ते वचन आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केलं आहे.
Thank you @anandmahindra ji for the new set of wheels with some very special customisation! I'm looking forward to taking the car out for a spin very soon. 🙂 pic.twitter.com/doNwgOPogp
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) October 30, 2021
आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याची मागणी एका युजरनं केली होती. त्यावर महिंद्रा यांनी रिप्लाय देत त्यांनी त्यांच्या कंपनीतील दोन अधिकाऱ्यांना टॅग करून नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितली होती. अखेर आनंद महिंद्रा यांनी नीरजला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि नीरजला नवी कोरी गाडी गिफ्ट म्हणून पाठवली. इतकेच नव्हे तर त्या गाडीवर 87.58 असं देखील लिहिलं हे. सोबत भाल्याची प्रतिकृतीही त्यावर लावलेली पाहायला मिळत आहे.
नीरजनं 87.58 मीटर लांब भालाफेकून सुवर्ण जिंकले होते त्यामुळं त्याच्यासाठी ही खास गाडी तयार करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव झाला होता. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.