Paris Olympics 2024: भारताचं पहिलं पदक निश्चित, तिरंदाजीत मराठमोळ्या खेळाडूसह तिघांची दमदार कामगिरी, मोठी अडचण दूर, कारण...
Archery Paris Olympics 2024: भारताला तिरंदाजीत एक पदक मिळणार हे निश्चित आहे. तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारतीय संघानं टॉप-4 मध्ये स्थान मिळवलं आहे.
Archery Paris Olympics 2024 पॅरिस : भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमधील सुरुवात तिरंदाजीतील सहभागानं मोहीम सुरु केली आहे. तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानं टॉप 4 मध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. महिला आणि पुरुष संघांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवल्यानं देशातील नागरिकांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. पुरुष संघाची पदक मिळवण्याची शक्यता जास्त आहे कारण तिरंदाजीतील पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघासोबत भारताचा सामना होणार नाही.
धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी 2013 गुण मिळत तिसऱ्या स्थानी झेप घेतला.भारताला तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात निश्चित करण्यात आलं आहे. भारताचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे. तुर्कीच्या संघानं 6 व्या तर कोलंबियानं 11 व्या स्थान मिळवलं होतं.12 व्या स्थानावर असलेल्या संघाला उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी एका सामन्यात विजय मिळवत टॉप 8 मध्ये स्थान मिळवावं लागतं.
भारताचं पदक निश्चित
भारताच्या संघाला पदक मिळू शकतं असं बोललं जातंय कारण अंतिम फेरीच्या लढतीपर्यंत भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार नाही.
भारतानं उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास त्यांचा सामना फ्रान्स, इटली किंवा कझाकिस्तान यांच्या विरुद्ध होईल. विशेष बाब म्हणजे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं दक्षिण कोरियाला पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं होतं.
तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकासाठी मॅच 29 जुलै रोजी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक तिरंदाजीमध्ये मिळू शकतं. दुसरीकडे महिला तिरंदाजीमध्ये भारताला पदक मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. दक्षिण कोरिया रँकिंग राऊडमध्ये पहिल्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास भारताचा उपांत्य फेरीत सामना बलाढ्य दक्षिण कोरियासोबत होणार आहे. भारताच्या महिला टीमनं तिरंदाजीत दमदार कामगिरी केली होती. दीपिका कुमारी (Deepika Kumari), अंकिता भकत आणि भजन कौर यांनी भारताला 1983 अंक मिळवून दिले.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॉकी सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार नऊ वाजता सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या :
Olympics 2024: भारताच्या लेकींची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत दमदार कामगिरी