एक्स्प्लोर

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं वेळापत्रक, 117 खेळाडू पदक जिंकण्यासाठी लढणार, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर   

Olympics 2024 India’s Schedule: पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन समारंभ 26 जुलै रोजी होणार आहे. भारताचं ऑलिम्पिकमधील अभियान  उद्यापासून सुरु होत आहे. 

Paris Olympics 2024 India’s Schedule Dates and Event Times पॅरिस: जगभरातील क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं लक्ष ज्या स्पर्धेकडे लागलेलं असती ती ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये (Paris Olympics 2024) सुरु होत आहे. उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी पार पडणार आहे. भारताचं अभियान उद्यापासून सुरु होणार आहे. भारताचे 117 खेळाडू 16 खेळांमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. 

भारतानं आतापर्यंतची सर्वात मोठी टीम ऑलिम्पिकला पाठवली आहे. यामध्ये एथलेटिक्स टीमध्ये 29 खेळाडू आहेत. यामध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा देखील समावेश आहे. नेमबाजीत भारताचे 21 खेळाडू मैदानात उतरणार आहेत. टोक्यो ऑलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.  

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीची आशा

तिरंदाजीत दीपिका कुमार आणि तरुणदीप रॉय रँकिंग राऊंडमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देऊ शकतात, त्यांच्या लढती 25 जुलै रोजी होतील.  27  जुलै रोजी संदीप सिंग / एलावेनिल वालारिवन आणि अर्जुन बबुता, रमित जिंदल मिश्र 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मैदानात उतरतील.  पिस्टल स्पर्धेत मनू भाकर देखील पदकाची दावेदार आहे. नीरज चोप्राच्या भालाफेक स्पर्धेची क्वालिफायर लढत 6 ऑगस्टला होईल.तर, 8 ऑगस्टला फायनल असेल.  

मीराबाई चानू 7 ऑगस्टला 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होईल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये लवलीना गोरगाहेन  27 जुलपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करेल. निखत झरीनकडून देखील पदकाची खूप अपेक्षा आहे.  

ऑलिम्पिकचं लाईव्ह प्रक्षेपण कुठं होणार?

पॅरिस ऑलिम्पिकचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स  18, डीडी स्पोर्ट्स 1.0  वरुन केलं जाईल. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान जिओ सिनेमावर देखील प्रक्षेपण केलं जाणार आहे. 

16 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी घेणार आहेत. यामध्ये तिरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, गोल्फ, हॉकी, जूडो, रोइंग, नौकायन, नेमबाजी, तैराकी, टेबल टेनिस आणि टेनिस या खेळांचा समावेश असेल. 

टोक्यो ऑलिम्पिकचं रेकॉर्ड

भारतानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 2020 मध्ये एका सुवर्णपदकासह सात पदकं जिंकली होती. यावेळी त्या पेक्षा अधिक पदकं जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय खेळाडू मैदानात उतरतील.  

भारताच्या खेळाडूंचं ऑलिम्पिकचं वेळापत्रक

क्रीडा प्रकार स्पर्धा सुरु होण्याची तारीख संपण्याची तारीख किती भारतीय खेळाडू लढणार
भारताच्या खेळाडूंची संख्या
तिरंदाजी 25 जुलै 4 ऑगस्ट 5 6
एथलेटिक्स 1 ऑगस्ट 10 ऑगस्ट 16 29
बॅडमिंटन 27 जुलै 5 ऑगस्ट 4 7
बॉक्सिंग 27 जुलै 10 ऑगस्ट 6 6
घोडेस्वारी 30 जुलै 4 ऑगस्ट 1 1
गोल्फ 1 ऑगस्ट 10 ऑगस्ट 2 4
हॉकी 27 जुलै 8 ऑगस्ट 1 16
जूडो 2 ऑगस्ट 2 ऑगस्ट 1 1
रोइंग 27 जुलै 3 ऑगस्ट 1 1
सेलिंग 1 ऑगस्ट 6 ऑगस्ट 2 2
शूटिंग 27 जुलै 5 ऑगस्ट 15 21
तैराकी 28 जुलै 29 जुलै 2 2
टेबल टेनिस 27 जुलै 10 ऑगस्ट 4 6
टेनिस 27 जुलै 4 ऑगस्ट 2 3
कुस्ती 5 ऑगस्ट 11 ऑगस्ट 6 6
वेटलिफ्टिंग 7 ऑगस्ट 7 ऑगस्ट 1 1

संबंधित बातम्या :

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणाच्या नावावर, टॉप 5 मध्ये 'या' देशांचा समावेश  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखलSuraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठीABP Majha Headlines : 06 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Embed widget