एक्स्प्लोर

शेन वॉर्न म्हणतो, मोहम्मद कैफ अहंकारी!

जगप्रसिद्ध फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न याचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशीत झाले. यामध्ये त्याने भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला अहंकारी म्हटले आहे.

मुंबई : जगप्रसिद्ध फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न याचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशीत झाले. या आत्मचरित्रात शेन वॉर्नने त्याच्या जीवनातील विविध घटनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्याने आयपीएलदरम्यान भारतात जो काही काळ घालवला त्याचेदेखील वर्णन आहे. शेन वॉर्न हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्यामुळे त्याने त्याच्या संघातील खेळाडू आणि इतर सदस्यांबाबतही यामध्ये उल्लेख केला आहे. आत्मचरित्रात त्याने भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला अहंकारी म्हटले आहे. आयपीएलमुळे शेन वॉर्न बराच काळ भारतात वास्तव्यास होता. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने आयपीएलच्या पहिल्या आयपीएलचे विजेतेपद पटकावले. वॉर्नने त्याच्या 'नो स्पिन' या आत्मचरित्रात आयपीएलदरम्यानचेच काही किस्से लिहिले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या अहंकाराचा किस्सा आहे. हा किस्सा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफबाबत आहे. हा किस्सा कैफच्या फॅन्सना आवडणार नाही. वॉर्नने म्हटले आहे की, 'आम्ही (राजस्थान रॉयल्सचा संघ) पहिल्यांदा एका हॉटेलात वास्तव्यासाठी उतरलो होतो. सर्वजन आपआपल्या खोल्यांकडे गेले. मी खोलीमध्ये गेलो नव्हतो. मी संघमालकांशी बोलत होतो. तेव्हा मी पाहिले की, कैफ हॉटेलमधील कर्मचाऱ्याशी बोलत होता. तो कर्मचाऱ्यांना 'मी कैफ आहे', असे पुन्हा पुन्हा सांगत होता. त्यावर मी कैफला विचारले काय झाले? त्यावर तो म्हणाला की, 'मला संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच लहान खोली मिळाली आहे'. यावर वॉर्नने त्याला विचारले तुला मोठी खोली हवी आहे का? त्यावर तो म्हणाला हो, 'मी कैफ आहे'. त्यानंतर वॉर्नच्या लक्षात आले की, कैफ हा वरिष्ठ खेळाडू असल्याने तो मोठ्या खोलीची अपेक्षा करतो. त्यावर वॉर्नने त्याला सांगितले की, 'इथल्या सर्वच खेळाडुंना समान आकाराच्या खोल्या दिल्या आहेत केवळ मला मोठी खोली देण्यात आली आहे'. संघमालक, प्रशिक्षक आणि इतरांशी भेटीगाठी करण्यासाठी मला मोठी खोली देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी होणार, फडणवीसांची माहितीGhatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Amit Shah Exclusive : राज्यात पक्षफुटीचा फायदा की तोटा? अमित शाह यांची सडेतोड मुलाखत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget