एक्स्प्लोर
भारत वि. न्यूझीलंड डे-नाईट कसोटीविषयी अद्यापही भूमिका स्पष्ट नाही!

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होणाऱ्या कसोटी आणि वन डे मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभय संघांमधली पहिली कसोटी 22 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत कानपूरमध्ये खेळवली जाईल. तर दुसरी कसोटी 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान इंदूरमध्ये खेळवण्यात येईल. या सामन्याच्या निमित्तानं इंदूरला पहिल्यांदाच कसोटी सामन्याच्या आयोजनाचा मान मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधली तिसरी आणि अखेरची कसोटी 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली जाईल. कोलकात्यामध्ये होणारा हा कसोटी सामना डे-नाईट खेळवली जाण्याची शक्यता होती, पण याबाबतची कोणतीही भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. कसोटी मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. उभय संघांमधली पहिली वन डे 16 ऑक्टोबरला धरमशालामध्ये, तर दुसरी वन डे 19 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये खेळवली जाईल. मोहालीमध्ये 23 ऑक्टोबरला तिसरी आणि रांचीत 26 ऑक्टोबरला चौथी वन डे खेळवण्यात येईल. भारत आणि न्यूझीलंड संघामधली पाचवी आणि अखेरची वन डे 29 ऑक्टोबरला विशाखापट्टणममध्ये खेळवली जाईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























