एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, केकेआरचा 102 धावांनी पराभव
मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
कोलकाता : मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला.
मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यात समसमान दहा गुण आहेत. पण मुंबईनं कोलकात्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट उंचावला. त्याच वेळी या पराभवानं कोलकात्याचा नेट रनरेट ढासळला. त्यामुळं मुंबईला गुणतालिकेत चौथं स्थान मिळवता आलं.
ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी २११ धावांचं आव्हान दिलं होतं. पण मोठ्या धावसंख्येचं आव्हान आणि प्ले ऑफची तीव्र चुरस यांच्या दडपणाखाली कोलकात्याचा अख्खा संघ अवघ्या १०८ धावांत गडगडला.
त्याआधी, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून तब्बल सोळा चौकार आणि चौदा षटकारांची वसुली केली. त्यामुळं मुंबईला वीस षटकांत सहा बाद २१० धावांची मजल मारता आली.
मुंबईच्या प्रतिहल्ल्यात यष्टिरक्षक ईशान किशननं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं अवघ्या १७ चेंडूंतच आपलं अर्धशतक साजरं केलं. ईशान किशननं २१ चेंडूंमधली ६२ धावांची खेळी दोन चौकार आणि सहा षटकारांनी सजवली.
सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं प्रत्येकी ३६ धावांची खेळी उभारली. बेन कटिंग २४, हार्दिक पंड्यानं १९ आणि एविन लुईसनं १८ धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement