एक्स्प्लोर

कर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी, धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव

बिल्डरला कर्ज चुकवता न आल्यामुळे 'हुडको' (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) झारखंडमधील इमारतीचा लिलाव करणार आहे.

रांची : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या दोन फ्लॅट्सचा लिलाव होणार आहे. धोनीचे फ्लॅट्स असलेल्या झारखंडमधील इमारतीच्या बिल्डरला कर्ज चुकवता न आल्यामुळे 'हुडको' (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा लिलाव करणार आहे. रांचीतील डोरंडा भागात हॉटेल युवराजजवळ 'शिवम प्लाझा' नावाची इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये धोनीच्या नावे अकराशे आणि नऊशे चौरस फूट क्षेत्राचे फ्लॅट्स आहेत. बिल्डर दुर्गा डेव्हलपर्स हुडकोचं सहा कोटी रुपयांचं कर्ज चुकवू न शकल्यामुळे पूर्ण प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे धोनीलाही याची झळ सोसावी लागत आहे. शिवम प्लाझाच्या लिलावाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अलाहाबादमधील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने लिलावाची आधार किंमत निश्चित करण्याची सूचना दिली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम हुडकोच्या खात्यात जमा होणार आहे. धोनीच्या फ्लॅटसह विक्री झालेल्या सर्व फ्लॅट्सचा लिलावात समावेश होणार आहे. दुर्गा डेव्हलपर्सने 'शिवम प्लाझा'साठी हुडकोकडून 12 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 'ग्राऊण्ड प्लस 10' अशी या इमारतीची रचना होती. जमिन मालकाचा दुर्गा डेव्हलपर्ससोबत वाद झाल्यामुळे सहा कोटींचं कर्ज दिल्यानंतर हुडकोने उर्वरित कर्जाची रक्कम देणं थांबवलं. त्यामुळे सहा मजल्यांनंतर बांधकाम स्थगित झालं. कर्जाची रक्कम परत करण्यास दिरंगाई केल्यामुळे हुडकोने 'दुर्गा डेव्हलपर्स'ला काळ्या यादीत टाकलं. धोनीने 'शिवम प्लाझा'मध्ये तीन मजल्यांवर फ्लॅट्स खरेदी केले होते. त्यापैकी दोन मजल्यांवरील फ्लॅट्स दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तळ मजल्यावरील दोन फ्लॅट्ससाठी धोनीने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Playing XI : ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
वयाच्या 55व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा फिटनेस! थेट आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली 2 गोल्ड मेडल, कोण आहे पुण्याचे राजेंद्र गायकवाड?
वयाच्या 55व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा फिटनेस! थेट आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली 2 गोल्ड मेडल, कोण आहे पुण्याचे राजेंद्र गायकवाड?
IND vs NZ 1st ODI Live Streaming : विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
IND VS NZ ODI Schedule : टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
Embed widget