एक्स्प्लोर

धोनी पुनरागमनाच्या तयारीत, नेट्समध्ये माहीचा कसून सराव

बीसीसीआयने नव्या मोसमासाठीच्या कॉण्ट्रॅक्ट यादीतून महेंद्रसिंह धोनीला वगळलं असलं तरी भारताच्या माजी कर्णधाराच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे फरक पडलेला नाही. धोनी सध्या झारखंड रणजी संघाच्या नेट्समध्ये कसून सराव करत आहे.

रांची : बीसीसीआयने नव्या मोसमासाठीच्या कॉण्ट्रॅक्ट यादीतून महेंद्रसिंह धोनीला वगळलं असलं तरी भारताच्या माजी कर्णधाराच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे फरक पडलेला नाही. धोनी सध्या झारखंड रणजी संघाच्या नेट्समध्ये कसून सराव करत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 विश्वचषक हे धोनीचं लक्ष्य आहे. आणि त्यादृष्टीनेच भारतीय संघात पुनरागमनाचा त्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला अशी चर्चा आहे की, धोनी आयपीएलसाठी सराव करतोय. मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यामुळे धोनीकडे सरावासाठी अवघे दोन महिनेच आहेत. त्यामुळे धोनी नेट्समध्ये कसून सराव करत आहे.

38 वर्षीय धोनी सध्या झारखंडच्या संघासोबत सराव करत आहे. झारखंडच्या संघातील सूत्रांनी सांगितले की, धोनी आजपासून टीममधील खेळाडूंसोबत सराव करणार आहे, ही बाब संघव्यवस्थापनाने सांगितली नव्हती. अचानक धोनीला मैदानात पाहून झारखंडच्या खेळाडूंना आणि त्याच्या चाहत्यांना सूखद धक्का बसला. झारखंडचा संघ रविवारी उत्तराखंडसोबतच्या रणजी सामन्याची सध्या तयारी करत आहे.

धोनी कसोटी क्रिकेटमधून 2014 सालीच निवृत्त झाला आहे. सध्या तो केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकानंतर (जूलै) धोनीने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधून सातत्याने माघार घेतली किंवा त्याला खेळवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने धोनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं टाळून, त्याला वेळीच निवृत्त होण्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. परंतु धोनी सरा करण्यासाठी मैदानात परतल्यामुळे सध्या तरी त्याचा निवृत्तीचा विचार नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बीसीसीआयनं आगामी मोसमासाठी जाहीर केलेल्या कॉण्ट्रॅक्ट यादीत कर्णधार विराट कोहली, एकदिवसीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन शिलेदारांचा ए प्लस श्रेणीत समावेश केला आहे. या सर्वोच्च श्रेणीतल्या खेळाडूंना सात कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल.

बीसीसीआयने ए श्रेणीत अकरा खेळाडूंचा समावेश केला असून, त्यांना पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget