एक्स्प्लोर
पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी
एकीकडे मोहम्मद शमीने कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा विश्वास एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केला, तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाविषयी नवीन माहिती समोर आली आहे.

कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाने गंभीर आरोप केले. तेव्हापासून दोघेही चर्चेत आहेत. एकीकडे मोहम्मद शमीने कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा विश्वास एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केला, तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाविषयी नवीन माहिती समोर आली आहे.
हसीन जहाविषयी अत्यंत कमी लोकांना हे माहित असेल की शमीसोबतचं हसीनचं दुसरं लग्न आहे. जग जिला आज शमीची पत्नी म्हणून ओळखतं त्या हसीनने यापूर्वी प्रेमविवाह केला होता.
हसीनने शेख सैफुद्दीन नावाच्या तरुणाशी पहिलं लग्न केलं होतं. हसीन दहावीत असताना दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2002 साली ते विवाहबंधनात अडकले. मात्र हसीनच्या नशिबात वेगळंच लिहिलेलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर म्हणजे 2010 साली दोघांचा घटस्फोट झाला.
हसीनचा पहिला पती सैफुद्दीनचं कोलकात्यात किराणा दुकान आहे. हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुलीही आहेत. एक मुलगी दहावीत, तर दुसरी सहावीत शिकते. दोन्हीही मुली कोलकात्यात सैफुद्दीनसोबत राहतात. हसीनने आपल्याला का सोडलं, ते माहित नसल्याचं सैफुद्दीनने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. हसीन मुलींशी आठवड्यातून दोन ते तीन वेळा फोनवर बोलते, असंही सैफुद्दीन म्हणाला.
हसीन जहाचं कुटुंब
हसीन जहाचे वडिल ट्रान्सपोर्टचं काम करतात. हसीन जहाच्या तीन बहिणी आहेत. मोठी बहीण दिल्लीत राहते, तर छोटी बहीण कोलकात्यात आहे.
घटस्फोटानंतर हसीनच्या आयुष्याचा प्रवास
2010 साली पती सैफुद्दीनशी घटस्फोट घेतल्यानंतर हसीनने नवं आयुष्य सुरु केलं. काही दिवसांनी हसीनची शमीशी ओळख झाली. हसीन 2014 सालच्या आयपीएलमध्ये चीअर लीडर म्हणून काम करत होती. त्याचवेळी तिची शमीसोबत ओळख झाली आणि जवळीकही वाढली. यानंतर हसीनने कोलकात्यात राहणं सुरु केलं आणि काही दिवसातच ती शमीसोबत विवाहबंधनात अडकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
