एक्स्प्लोर
जयंतनं कानमंत्र दिला अन् शमी चमकला!
विशाखापट्टणम: विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 246 धावांनी दणदणीत पराभव करुन 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0नं बढत घेतली आहे. पण याच सामन्यात टीम इंडियाला जयंत यादव हा एक नवा अष्टपैलू सापडला आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात त्यानं आपली चुणूक दाखवून दिली. परिस्थितीनुसार, फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या जयंतचं वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनंही कौतुक केलं.
विशाखापट्टणमच्या या सामन्यात प्रत्येक दिवशी बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपल्यानंतर भारताकडे 200 धावांची मजबूत आघाडी होती. हीच आघाडी कायम ठेऊन विजय मिळविण्याच्या इराद्यानं उतरलेली टीम इंडिया सुरुवातीलाच गडगडली. अवघ्या 40 धावात टीम इंडियाचे 3 फलंदाज माघारी परतले. त्यानंतर कर्णधार कोहलीनं 81 धावांची खेळी करुन टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला. कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली आहे.
दुसऱ्या डावात भारतानं 162 धावांच्या मोबदल्यात 9 गडी गमावले होते. किमान 200 धावा करुन टीम इंडियानं 400 धावांची बढत घ्यावी असं सर्वानाच वाटत होतं. पण 9 विकेट गेल्या असल्यानं भारत 400 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत नव्हतं. त्याचवेळी मैदानात असलेली शमी आणि जयंत यादवच्या शेवटच्या जोडीनं ती किमया करुन दाखवली.
'लक्षात ठेव आपल्याला त्यांना 400 धावांचं टार्गेट द्यायचं आहे.'
सुरुवातीपासूनच जयंत यादव अगदी संयमीपणे खेळत होता. उमेश यादव बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या शमीला त्यानं कानमंत्र दिला. 'आपल्याला 400 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर तू हवे तसे फटके मार, पण तोपर्यंत संयम ठेव. जेव्हा तुझ्या रडारमध्ये चेंडू येईल. त्याचवेळी जोरदार फटका मार.' असं जयंतनं शमीला बजावलं. सामन्यानंतर ही गोष्ट खुद्द शमीनं कबूल करत जयंतचं कौतुक केलं.
यावेळी जयंतनं स्वत: वेगवान गोलंदाजांची सामना केला. त्यामुळे फिरकी गोलंदाजांवर जास्तीत जास्त प्रहार करण्याची संधी शमीला मिळाली. याचवेळी शमीनं फिरकी गोलंदाजांना दोन उत्तुंग षटकार मारले. मोक्याच्या क्षणी फलंदाजी करत दोघांनी तब्बल 42 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतानं दुसऱ्या डावात 204 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं आव्हान ठेवलं. तर या सामन्यात जयंत यादवनं आपली छाप पाडली. जयंत पहिल्या डावात फलंदाजी करताना 35 धावा केल्या. तर गोलंदाजीत 1 बळी घेतला. तर दुसऱ्या डावात २७ धावा केल्या. तर उत्कृष्ट गोलंदाजी करत त्यानं तब्बल 3 बळी मिळवले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement