एक्स्प्लोर
मिताली राज महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आाला आहे. मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.
बुधवारी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या गेलेल्या महिला विश्व चषकातील सामन्यात मितालीने ही
कामगिरी बजावली. हा मितालीचा 183 वा एकदिवसीय सामना होता.
मितालीने इंग्लंडची माजी क्रीडापटू शार्लोट एडवर्ड्सचा विक्रम मोडित काढला आहे. एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ 164 डावातच ही मजल मारली.
मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!
मितालीने तिच्या कारकीर्दीत पाच शतकं आणि 48 अर्धशतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. मितालीने यापूर्वीच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सात अर्धशतकं ठोकण्याचाही विक्रम रचला आहे. 1999 मध्ये मितालीने आयर्लंड विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात तिने शतकी खेळी केली होती.बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते...!
महिला वनडे इंटरनॅशनलमध्ये ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू ब्लेंडा क्लार्क तिसऱ्या स्थानावर आहे. क्लार्कने 118 वनडे सामन्यांत 4 हजार 844 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत पहिलं द्विशतक ठोकणारी क्लार्क ही पहिली क्रीडापटू आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement